JEE, NEET 2021: जेईई नीटच्या अभ्यासक्रमात कपात

JEE, NEET 2021: जेईई नीटच्या अभ्यासक्रमात कपात

JEE, NEET 2021: जेईई नीटच्या अभ्यासक्रमात कपात

देशातील लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ज्या प्रश्नाच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होते. त्या प्रश्नाच्या उत्तराची प्रतीक्षा आता संपली आहे. या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांनी अखेर दिले. ते म्हणाले की यंदाची जेईई मेन (JEE Main), आणि जेईई एडवांस्ड (JEE Advanced) आणि नीट (एनईईटी) च्या अभ्यासक्रमात कपात करण्यात येत आहे. शिक्षणमंत्री डॉ.निशंक यांनी सोमवारी घेतलेल्या लाइव वेबिनारमध्ये देशातील केंद्रीय विद्यालयांशी संवाद साधला आहे. यादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जेईई मेन, एडवांस्ड आणि नीटच्या अभ्यासक्रमाबाबत आणि परीक्षांबाबत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्त दिले आहे.

बोर्डाच्या परीक्षेत सीबीएसईने ३० टक्के अभ्यासक्रम कपात केला आहे. यावेळी बोर्ड परीक्षांसाठी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात आले की, कपात करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारला जाणार नाही. तुम्हाला उर्वरित अभ्यासक्रमावर प्रश्न विचारण्यात येईल. अशाचप्रकारे जेईई मेन, एडवांस्ड आणि नीट परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातील.

ऑनलाईन शिकवण राहणार सुरु

वेबिनारमध्ये शाळा सुरु झाल्यानंतरही ऑनलाईन वर्ग सुरु राहणार का? एका विद्यार्थ्याने विचारलेल्या या प्रश्नाला शिक्षणमंत्री यांनी उत्तर दिले की, शाळा सुरु झाल्यानंतरही सध्या ऑनलाईन क्लासेचा पर्याय सुरु ठेवला जाईल. आताही वर्ग सुरु केल्यावर १०० टक्के क्षमतेने वर्ग उपस्थित राहणे शक्य होणार नाही. यामुळे ऑनलाईन आणि प्रत्यक्ष शिकवण सुरु राहील.

First Published on: January 18, 2021 8:26 PM
Exit mobile version