Jet Airways च्या कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

Jet Airways च्या कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेले मोठे नुकसान आणि कर्जामुळे एप्रिल २०१९ मध्ये बंद झालेलं जेट एअरवेज पुन्हा आकाशात झेप घेण्यास सज्ज आहे. कर्जदारांची परतफेड करण्यासाठी व कंपनीत ८९.७९ टक्के भागभांडवल मिळवण्यासाठी पहिल्या दोन वर्षात ६०० कोटींची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव संघटनेने मांडला आहे. या करारानुसार कर्मचार्‍यांसह कामगारांना पहिल्या सहा महिन्यांत ११३ कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिंटच्या अहवालानुसार, संघटनेने येत्या पाच वर्षांत १ हजार १८३ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे. जेटला लंडन स्थित मालमत्ता व्यवस्थापन कंपनी कॅलरॉक कॅपिटल आणि उद्योजक मुरारीलाल जालान यांचे कन्सोर्टियम खरेदी करीत आहे.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल किंवा एनसीएलटीकडून रिझोल्यूशन आराखड्यास मान्यता दिल्यानंतर १८० दिवसांच्या आत कंपनीचे भांडवल २८० कोटी असेल. त्यापैकी १०७ कोटी रुपये आर्थिक लेनदारांना, ४३ कोटी सीआरआयपी, ११३ कोटी रुपये कर्मचारी आणि कामगारांना, ९ कोटी अन्य लेनदारांना आणि आठ कोटी रुपये आकस्मिकता निधीला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, जेट एअरवेज एप्रिल २०१९ मध्ये कोरोनामुळे प्रचंड नुकसान आणि कर्जामुळे बंद झाली. त्यावेळी कंपनीचे प्रमोटर नरेश गोयल यांना ५०० कोटी रुपयांची गरज होती, परंतु ती रक्कम उपलब्ध होणं शक्य झाले नाही. यासह कर्मचार्‍यांचा पगार व इतर खर्चही देऊ शकले नाही. जेट एअरवेज बंद झाल्यानंतर साधारण १७ हजार कर्मचारी बेरोजगार झाले. यानंतर जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या बँकांच्या कन्सोर्टियमने नरेश गोयल यांना कंपनीच्या बोर्डातून काढून टाकले.

First Published on: February 25, 2021 11:28 AM
Exit mobile version