आजारामुळे जेट एअरवेजच्या १४ विमाने रद्द

आजारामुळे जेट एअरवेजच्या १४ विमाने रद्द

प्रातिनिधिक फोटो

देशातील प्रसिद्ध विमान वाहतूक कंपनी ‘जेट एअरवेज’ चे पायलट एकावेळीच रजेला गेल्यामुळे कंपनीची चांगलीच पंचाईत झाली आहे. पायलटचा तुटवडा असल्यामुळे कंपनीचे १४ विमानांच्या फेऱ्या रद्द केल्या आहे. याचा भार आता इतर कर्मचाऱ्यांवर पडल्यामुळे नाराजीचा स्वर उमटत आहे. दरम्यान फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवांशांनीही जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. सुत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांचा पगार थकवल्याने पायलट्स ने सुट्टी घेतल्याचे सांगितले जात आहे. जेट एअरवेजने त्यांना सप्टेंबर महिन्याचा पगार दिला आहे. मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा पगार अजूनही कंपनीने थकवला आहे. कर्मचारी आणि कंपनीच्या वादात प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येत्या काळात जेट एअरवेजचे भविष्य धोक्यात असल्याचे चित्र आहे.

मॅनेजमेंटला लिहिले पत्र

पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यानी कंपनीच्या मॅनेजमेंटला पत्र लिहिले आहे. पायलटला पगार वेळेवर देण्यात यावा असे या पत्रात लिहिले आहे. पगार दिला नाहीतर काम बंद करण्याचाही इशारा त्यांनी दिला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना अगोदरच एसएमएस करण्यात आला. विमाने रद्द झाल्याची माहिती एसएमएस द्वारे देण्यात आली. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्यात येईल किंवा त्यांचे पैसे केल्या जातील अशी घोषणा ही कंपनीने केली आहे.

या आधीही विमाने झाली होती रद्द

विमानांच्या फेऱ्या रद्द करण्याची ही पहिली वेळ नाही. अशा प्रकारच्या घटना या पूर्वीही झाल्या होत्या. पायलट आणि इंजिनयरने काम बंद केले होते. यामुळे देशांतर्गत विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. सेवा मिळत नसल्यामुळे प्रवासी जेट एअरवेजकडे पाठ फिरवतात आहे. याचा फटका कंपनीला बसतो आहे आणि वेळेत पगार न मिळाल्याने कर्मचारी जेट ऐअरवेजला सोडून चाचले आहे.

First Published on: December 3, 2018 2:50 PM
Exit mobile version