…आणि ‘शाहरुख’ने मानले ‘जॉन सिना’चे आभार

…आणि ‘शाहरुख’ने मानले ‘जॉन सिना’चे आभार

प्रातिनिधिक फोटो

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि रेसलर ‘जॉन सिना’याने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानबद्दल ट्विट केले आहे. यानंतर शाहरुखने देखील त्याचे ट्विटवरुन आभार मानले आहे. जॉन सिना नेहेमी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर भारतीय कलांकारांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. या पूर्वीही त्याने आमीर खान, राहूल द्रवीड आणि अमिताभ बच्चन यांचाही फोटो शेअर केले होते. सिनाच्या ट्विटला आतापर्यंत १६ हजार हून अधिक लाईक्स मिळाले आहे. या लाईक्समध्ये भारतीयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दरम्यान शाहरुख खान सध्या आनंद एल राय यांच्या झिरो चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरुख सोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा झळकणार आहेत.

काय केल होत ट्विट

 

जॉन सिना याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहीले होते की,”जीवनातील आनंद वाढवण्यासाठी किंवा कष्ट कमी करण्यासाठी ताकद किंवा गरिबी कामी येत नाही.- शाहरुख खान”. या पोस्ट नंतर शाहरुख आणि सिनाच्या फॅन्सने यावर कमेंट्स केली आहेत.

शाहरुखने दिले असे उत्तर

 

बॉलिवूडचा किंग खान नेहेमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. जॉन सिनाच्या ट्विटवर त्याने आज लिहिले आहे की,”चांगल्या गोष्टी पसरवल्याबद्दल धन्यवाद मित्रा. जी मुले तुला आपला हिरो मानतात त्यांना प्रेरित करण्यासाठी हे आवश्यक आहे.”

First Published on: July 9, 2018 6:29 PM
Exit mobile version