पत्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूस ते स्वत: जबाबदार; तालिबान्यांचे स्पष्टीकरण

पत्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूस ते स्वत: जबाबदार; तालिबान्यांचे स्पष्टीकरण

पत्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूस तो स्वत: जबाबदार; तालिबान्यांचे स्पष्टीकरण

16 जुलै रोजी अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या स्पिन बोल्दक शहरावरील बाजरपेठेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्ना दरम्यान चकमक झाली होती. या दरम्यान एका अफगाण (Afghanistan) अधिकाऱ्यासह पुलित्जर पुरस्कार विजेते फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तालिबानच्या राजनितिक कार्यालयाचे प्रवक्ता असलेल्या सोहेल शाहि यांनी दानिश सिद्दीकी हे त्यांच्या मृत्यूसाठी स्वत: जबाबदार असल्याचा खुलासा केला आहे. सोहेल शाहि यांनी भारतीय माध्यमांना दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे की, ‘ त्या दिवशी घडलेल्या सर्व प्रकारत दानिश सिद्दीकी यांच्या हत्येला ते स्वत: जबाबदार आहेत. कारण त्यांनी रिपोर्टींग करतांना तालिबानमधील लोकांशी कोणताही समन्वय ठेवला नाही. तसेच आम्ही प्रत्येक वेळी पत्रकरांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो. करण यामुळे आम्ही त्यांना सुरक्षा प्रदान करु शकतो.’  (Journalist Danish siddiqui himself responsible for death, taliban gave explanation)

भारतीय फोटो जर्नलिस्ट,पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधील कंदाहार येथे वृत्तांकन गेले असता चकमकीत त्यांची हत्या झाली. दानिश सिद्दीकी हे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेचे दिल्ली ब्युरोतील मुख्य छायाचित्रकार पदी काम करत होते. त्यांच्या हत्येच्या वृत्तानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. या वृत्तानंतर माध्यम क्षेत्रातून मोठा निषेध व्यक्त करण्यात आला. दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससोबत होते त्यांच्यासोबत ते तालिबानविरुद्ध कारवायांचे वृत्तांकन करत होते.


हे हि वाचा – अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्ष , काय आहे नेमके प्रकरण?

First Published on: August 14, 2021 11:57 AM
Exit mobile version