नितीश कुमार सरकारने पत्रकारांसाठी घेतला मोठा निर्णय, कोरोना लसीकरणाबाबत दिला आदेश

नितीश कुमार सरकारने पत्रकारांसाठी घेतला मोठा निर्णय, कोरोना लसीकरणाबाबत दिला आदेश

बिहारमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आज (रविवार) आदेश जारी करून पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर श्रेणीत सामील केले आहे. जन संपर्क विभागाच्या माध्यमातून मान्यता प्राप्त पत्रकारांना कोरोना लस देणार असल्याचे आदेशात सांगण्यात आले आहे.

यात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि वेबमीडियाच्या पत्रकारांना सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधान्याच्या आधारे सर्व पत्रकारांची ओळख पटवून लस दिली जाणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात पत्रकार आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावत आहेत. ते कोरोना संदर्भात लोकांना जागरूक देखील करत आहेत.

दरम्यान बिहारमध्ये आज १३ हजार ५३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ११ हजार ६९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बिहारमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ९७ हजार ६४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ हजार ७३९ जणांचा मृत्यू झाला असून ३ लाख ८४ हजार ९५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १ लाख ९ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – coronavirus : भारताला तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्यासाठी युनिसेफचा पुढाकार


 

First Published on: May 2, 2021 10:48 PM
Exit mobile version