‘ना हम डरेंगे, ना दबेंगे’, राणेंच्या अटकेनंतर भाजप हायकमांडची पहिली प्रतिक्रिया

‘ना हम डरेंगे, ना दबेंगे’, राणेंच्या अटकेनंतर भाजप हायकमांडची पहिली प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून आता भाजप हायकमांडकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या अटकेचा निषेध नोंदवला आहे. ना हम डरेंगे, ना दबेंगे, असा इशारा जेपी नड्डा यांनी दिला आहे.

जेपी. नड्डा यांनी यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेली अटक ही संवैधानिक मूल्यांचं हनन आहे. अशा प्रकारच्या कारवाईने आम्ही घाबरणार नाही आणि दबणारही नाही. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने हे लोक चिंताग्रस्त आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहणार. यात्रा सुरूच राहील, असं जेपी नड्डा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नारायण राणे यांना अटक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. संगमेश्वरमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पेलिसांनी अटक केले आहे. नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेशी चर्चा केली. त्यावेळी नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते.

 

First Published on: August 24, 2021 6:18 PM
Exit mobile version