मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये भूकंप, ज्योतिरादित्य सिंधियांचा राजीनामा!

मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये भूकंप, ज्योतिरादित्य सिंधियांचा राजीनामा!

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ट्विटरवर त्यांनी राजीनामा पोस्ट केला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजीनामा काँग्रेससाठी प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे. आज मोदी-शाह यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.

ज्योतिरादित्य सिंधीया हे आज संध्याकाळी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज ज्योतिरादित्य सिंधिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दिल्लीत गेले आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत. गेले काही महिने म्हणजेच मध्य प्रदेशात झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसने यश मिळवलं खरं. मात्र कमलनाथ यांना मुख्यमंत्री करणं हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना चांगलंच भोवलं आहे. कारण ज्योतिरादित्य सिंधिया यांची नाराजी सत्ता स्थापन झाली तेव्हापासून आहे. त्यामुळेच आज ज्योतिरादित्य सिंधीया भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

तर भाजपला होईल फायदा

मध्यप्रदेश सरकार पाडण्यात काहीही रस नाही असं माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. तरीही कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यालत्या मतभेदांचा फायदा हा होणार हे स्पष्ट आहे. मध्यप्रदेशात भाजपाकडे १०७ जागा आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत १७ आमदार आले तर भाजपची सत्ता मध्यप्रदेशात स्थापन होऊ शकते.

First Published on: March 10, 2020 12:04 PM
Exit mobile version