#NoBra कॅम्पेन सुरू करणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध विदेशी अभिनेत्रीचा मृत्यू

#NoBra कॅम्पेन सुरू करणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध विदेशी अभिनेत्रीचा मृत्यू

सोशल मीडियावर #NoBra कॅम्पेन चालविणारी दक्षिण कोरियाची आंतरराष्ट्रीय पॉप स्टार सुली तिच्या घरात मृत अवस्थेत आढळली आहे. ती अवघ्या २५ वर्षांची होती. तिने आपल्या करिअरची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती. के-पॉप स्टार आणि अभिनेत्री सुलीचा मृतदेह सोमवारी दक्षिण कोरियाच्या सियोल येथे तिच्या घरी सापडला. या घडलेल्या प्रसंगानंतर सुलीच्या मॅनेजरने तिला फोन लावला, मात्र तिने फोन उचलला नाही त्यावेळी तिचा मॅनेजर तिच्या घरी पोहोचला. तेव्हा ती अभिनेत्री मृत असल्याचे त्याला समजले. सुली नैराश्याची बळी पडली होती. दरम्यान तिच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली आहे.

#NoBra कॅम्पेन सुरू केल्यानंतर चर्चेत

जगप्रसिद्ध पॉप स्टार सुलीने सोशल मीडियावर #NoBra कॅम्पेन सुरू केल्यानंतर सर्वत्र चर्चेत आली होती. हे अनोखं कॅम्पेन सुरू केल्यानंतर तिने आपले ब्राशिवाय घातलेले कपडे इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. अनेक स्त्रियांनी सुलीच्या या कॅम्पेनला त्यांचा पाठिंबा दर्शवला तर काहीनी यावर सडेतोड प्रतिक्रिया देऊन या विदेशी अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल केले. नैराश्याने बळी पडलेल्या सुलीच्या मृत्यूचा संबंध सोशल मीडियाच्या ट्रोलिंगशी जोडला जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

इन्स्टाग्रामवर ६.४ मिलियन फॉलोअर्स

सुलीच्या घरातून एक चिठ्ठीही पोलिसांना मिळाली असून त्यात काय लिहिले आहे ते पोलिसांनी उघड केले नाही. सुली दक्षिण कोरियाची गायिका आणि अभिनेत्री होती आणि इन्स्टाग्रामवर तिचे ६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. #NoBra कॅम्पेन नंतर सोशल मीडियावर आलेल्या अपमानास्पद प्रतिक्रियेमुळे सुली खूप नाराज होती आणि तेव्हापासून ती नैराश्यात होती. त्यांच्या मृत्यूविषयी अद्याप कुठलाही अंदाज बांधला नसतांना ते संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचे सियोल पोलिसांनी सांगितले.

या अभिनेत्रीच्या घरात बसविलेले सीसीटीव्ही देखील तपासले पण कॅमेर्‍यामध्ये घरात बाहेरील व्यक्ती आल्याचे काही फुटेज मिळाले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

First Published on: October 15, 2019 3:50 PM
Exit mobile version