मी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवणार – कमल हसन

मी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवणार – कमल हसन

Hijab Controversy : सावध राहण्याची वेळ आलीय! विद्यार्थ्यांमध्ये विषारी भिंत उभी केली जातेय - कमल हासन

राजकीय आखाड्यात उतरलेले अभिनेते कमल हसन यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले आहे. याआधी त्यांनी ‘मक्कल निधी मय्यम’ (एमएनएम) हा त्यांचा पक्ष तामिळनाडूतील विधानसभेच्या २० जागांची पोटनिवडणूक लढवेल, अशी घोषणा केली होती. आता त्यांनी, आपण निश्चितच आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा केली आहे. कमल हसन यांच्या पक्षाने तामिळनाडूतील २० जागांवर निवडणूक लढविण्यासाठी याआधीच ८० टक्के कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे.

वाढदिवसाच्या दिवशी केलेली घोषणा

ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी ७ नोव्हेंबर म्हणजेच त्यांच्या वाढदिवसादिवशी एक महत्त्वाची घोषणा केली होती. तामिळनाडूच्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा पक्ष २० जागा लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. यासाठी या वीसही मतदारसंघात त्यांच्या पक्षाने कार्यकर्त्यांची फौज कामाला लावले. पोटनिवडणूक कधी होणार हे कोणालाच आता माहीत नाही. मात्र आमचा पक्षा आतापासूनच निवडणुका लढवण्यासाठी सज्ज झाला असल्याचे कमल हसन यांनी म्हटले होते.

वाचा : कमल हसनचा पक्ष २० जागांवर निवडणूक लढवणार

वाचा : सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही- कमल हसन

वाचा : कमल हासन जखमींना भेटले, मात्र आंदोलक संतापले

First Published on: December 22, 2018 3:12 PM
Exit mobile version