सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही- कमल हसन

सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही- कमल हसन

अभिनेता- राजकारणी कमल हसन आपत्तीग्रस्तांची भेट घेतांना

गाजा चक्रीवादळानंतर लोकांना मदत करण्यास असमर्थ ठरलेल्या राज्य सरकारवर अभिनेता आणि राजकारणी कमल हसन यांनी टीका केली आहे. सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कमल हसन यांनी आपत्तीग्रस्तांना नुकतीच भेट दिली आहे. यावेळी त्यांनी लोकांशी संवाद साधला. याच सोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लकरच येथील दौरा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. कमल हसन यांनी भेट दिल्याचे व्हिडियो ट्विटरवर टाकण्यात आले आहेत. विख्यात अभिनेता कमल हसन यांन राजकारणात प्रवेश घेत आपला नवा पक्ष स्थापन केला आहे. मक्कल नीधि माईमचे या पक्षाचे ते संस्थापक आहेत. हसन यांनी रविवारी तमिळनाडू सरकारच्या अखिल भारतीय अण्णा द्रविडा मुनेत्र कझागम वर टीका केली. एका इंग्रजी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वक्तव्य केले आहे. गाजा चक्रीवादळाने तमिळनाडू राज्यात थैमान घातले होते. यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले होते तर अनेकांची घरे उद्ध्वस्त झालीत. मात्र अजूनही बहूतेक नागरिकांना मदत मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

नागरिकांनी केले आंदोलन

वादळानंतर तत्काळ मदत न मिळाल्यामुळे काही क्षेत्रातील नागरिकांनी राज्य सराकरचा विरोध केला आहे. कोठमंगलम येथील ग्रामीण नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. नागरिकांनी येथे सरकारी अधिकाऱ्यांना येण्यापासून अडवले. या आंदोलनात ५० नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्य सरकारने आपत्तीग्रस्त कुटुंबाला १० लाखाची मदत जाहीर केली आहे. जखमी झालेल्या प्रत्येकाला सरकारने २५ हजाराची मदत जाहीर केली.

काय म्हणाले कमल हसन?

पुर्नवसनाचे कार्य एका रात्रीतून होत नाही. राज्याचे महामार्ग चांगले असतील तरच लोक येथे मदतीसाठी येऊ शकतील. मात्र जर तुम्ही खेडेगाव बघसाल तर तुम्हाला समजेल येथील लोकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री एडप्पादी के पलानीस्वामी यांनी काही भागांनाच भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्व भागांना भेट देणे गरजेचे आहे. हे राजकीय वक्तव्य नाही तर लोकांकडून मिळाल्या तक्रारी आहेत. मला यातून कोणत्याही प्रकारचा राजकीय फायदा करुन घ्यायचा नाही.

First Published on: November 25, 2018 7:14 PM
Exit mobile version