Loksabha Election 2024 : नेताजी सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान; कंगनाने पुन्हा तोडले तारे

Loksabha Election 2024 : नेताजी सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान; कंगनाने पुन्हा तोडले तारे

कंगना रणौतचं पुन्हा धाडसी विधान

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा उमेदवार कंगना रणौत हिने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेला तोंड फोडले आहे. राजधानी दिल्लीत एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगना रणौत बरेच काही बोलली. पंतप्रधान मोदी सूर्य आहेत तर विरोधक मेणबत्ती आहेत, असं वक्तव्य करत तिने पुन्हा एकदा 2014 प्रमाणेच आणखी एक मोठे धाडसी विधान केले आहे. या विधानामुळे तिच्यावर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…  Loksabha 2024: कंगना प्रकरण श्रीनेत यांना भोवले; कॉंग्रेसने तिकीट नाकारले

बॉलीवूड ‘क्वीन’ कंगना रणौत हिला भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडीमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तिने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वातंत्र्यसैनिक आणि आझाद हिंद फौजेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा देशाचे पहिले पंतप्रधान असा उल्लेख केला. कंगनाच्या या विधानाने सर्वांनीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली.

ज्या व्यक्तीने देशासाठी रक्त दिलं, स्वातंत्र्य दिलं त्या नेताजी सुभाषबाबूंना देशाचे पंतप्रधान का बनवले नाही, असा सवाल कंगनाने केला. एवढेच नाही तर नेताजी सुभाषबाबू नंतर कुठे गायब झाले, असाही सवाल करत कंगनाने संशयाची सुई काँग्रेसकडे रोखली. विशेष म्हणजे यापूर्वीही कंगनाने अशीच बरेच वादग्रस्त वक्तव्ये केली आहे. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हाच देशाला स्वातंत्र्य मिळाले, असेही धाडसी विधान करून कंगनाने यापूर्वी विरोधकांच्या टिकेला अंगावर घेतले होते.

हेही वाचा…  Shiv Sena : अभिनेता गोविंदा अहुजा यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

यावेळी कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सूर्याची तर विरोधकांना मेणबत्तीची उपमा दिली. विरोधी पक्षाचे बहुतांश नेते भ्रष्टाचारात बुडाले आहेत, असाही आरोप तिने केला. हे सर्व विरोधी पक्षनेते एकत्रही येऊ शकत नाही. म्हणूनच त्यांची पंतप्रधान मोदींशी तुलना केल्यास विरोधकांना मेणबत्ती म्हणावे लागेल, अशी टीका कंगनाने केली. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री कंगना रणौतच्या या धाडसी विधानामुळे आता पुन्हा नव्या वादाला सुरुवात होणार एवढे नक्की!

First Published on: March 28, 2024 5:39 PM
Exit mobile version