घरदेश-विदेशLoksabha 2024: कंगना प्रकरण श्रीनेत यांना भोवले; कॉंग्रेसने तिकीट नाकारले

Loksabha 2024: कंगना प्रकरण श्रीनेत यांना भोवले; कॉंग्रेसने तिकीट नाकारले

Subscribe

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरा उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. या यादीत 14 उमेदवारांची नावे आहेत. पक्षाने झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीनुसार काँग्रेसने महिला प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांचे तिकीट रद्द केले आहे. (Loksabha 2024 Kangana case hits Supriya Shrinate Congress rejected the ticket pup)

श्रीनेत यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून लढवली होती. परंतु भाजपच्या पंकज चौधरी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. अभिनेत्री कंगना राणौतवर केलेल्या वक्तव्यामुळे सुप्रिया श्रीनेत भाजपच्या निशाण्यावर आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडीमधून भाजपने कंगनाला उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

यावेळी सुप्रिया श्रीनेत यांच्या जागी काँग्रेसने वीरेंद्र चौधरी यांना लोकसभा निवडणुकीत महाराजगंजमधून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. वीरेंद्र चौधरी हे महाराजगंज जिल्ह्यातील फरेंडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून ते पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षदेखील आहेत. यावेळीही भाजपने अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना महाराजगंजमधून उमेदवारी दिली आहे. पंकज यांनी सलग 6 वेळा येथून निवडणूक जिंकली आहे. 2019 मध्ये पंकज यांना 7 लाख 26 हजारांहून अधिक मते मिळाली होती.

सुप्रिया श्रीनेतबद्दल बोलायचे तर तिने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर कंगना रणौत आणि मंडी यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट करून मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. अभिनेत्री कंगना राणौत विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल निवडणूक आयोगाने बुधवारी काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

- Advertisement -

तत्पूर्वी, संपूर्ण एपिसोडवर स्पष्टीकरण देताना, सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या होत्या की त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम खात्यांचा अॅक्सीस अनेक लोकांकडे आहे. त्यापैकी एकाने आज खूप अयोग्य पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, “मला कळताच मी ती पोस्ट काढून टाकली. जे मला ओळखतात त्यांनाही हे चांगलंच माहीत आहे की मी कधीही कोणत्याही महिलेबद्दल वैयक्तिक आणि असभ्य टिप्पणी करू शकत नाही.

(हेही वाचा: Rashmi Barve : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का, लोकसभा उमेदवार रश्मी बर्वेंचे जात प्रमाणपत्र रद्द)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -