कन्हैया कुमार वि. गिरीराज सिंह कांटे की टक्कर

कन्हैया कुमार वि. गिरीराज सिंह कांटे की टक्कर

कन्हैया कुमार वि. गिरीराज सिंह

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे युवा नेते कन्हैया कुमार विरुद्ध भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीरराज सिंह यांच्या बिहारच्या बेगुसरायमधील लोकसभा निवडणूक लढतीवर सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला कन्हैया लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी जमा करून निवडणूक लढवत आहे.

गेल्या चार वर्षांपासून कन्हैया कुमारचे सहकारी आणि सध्या त्याला निवडणूक व्यवस्थापनात मदत करणाऱ्या वरुण आदित्य यांनी कन्हैयाच्या जवळच्या लोकांना मदतीचे आवाहन केल होते. आदित्य यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मार्चला निधी संकलनाची सुरूवात झाली आणि काही तासांतच 30 लाख रुपये जमा झाले. आम्ही 33 दिवसांत 70 लाख रुपये जमा करण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे, असं ते म्हणाले. कन्हैयासाठी क्राउड फंडिंग करणारी या संस्थेच्या संस्थापकांमध्ये दिल्ली डायलॉगच्या माजी सदस्यांपासून अनेक पत्रकारांचाही समावेश आहे.

भाजपने ही जागा प्रतिष्तेची केली असून केली असून कोणत्याही परिस्थितीत ती जिकून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे गिरीराज यांनी कन्हैया कुमारला देशद्रोही म्हणत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे जवाहर लाल विद्यापीठातील अनेक आजी माजी विद्यार्थी बेगुसरायमध्ये येऊन दाखल झाले आहेत. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणीही सध्या कन्हैया कुमार यांच्या प्रच्रारा साठी बेगुसरायला आले आहेत. यामुळे गिरीराज यांच्या पायखालची वाळू सरकली आहे.

गुजरातमधून बिहारी लोकांना हाकलून देणार्‍या जिग्नेशसारख्या लोकांना बाहेरचा रस्ता दाखवाला हवा, असे सांगत गिरीराज यांनी लोकल कार्ड खेळण्याचा डाव टाकला आहे खरा, पण तो कितपत यशस्वी होईल, याविषयी शंका आहे. बेगुसराय हा एकेकाळी डाव्या पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे.

First Published on: April 3, 2019 4:01 AM
Exit mobile version