करोना पॉझिटीव्ह कनिका कपूरच्या मित्राचा शोध

करोना पॉझिटीव्ह कनिका कपूरच्या मित्राचा शोध

बेबी डॉल गाण्यामुळे नावारुपास आलेली गायिका कनिका कपूर करोनाग्रस्त असल्याचे समोर आल्याने तिच्यावर लखनौ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कनिकाने लंडनहून आल्यानंतर तिने अनेक पार्टयांमध्ये हजेरी लावली त्यातील ३४ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पण कनिकाचा जवळचा मित्र असलेला बिझनेसमन ओजस देसाई मात्र गायब आहे. त्यालाही करोनाची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

ओजस १६ मार्च रोजी ताज हॉटेलमधील पार्टीमध्ये कनिकाबरोबर होता. पार्टीत सहभागी झालेल्या २६० जणांना पोलिसांनी शोधून काढले आहे. पण फक्त ओजसचा अजून काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. जर त्याला लागण झालेली नाही तर मग तो पोलिसांपुढे का येत नाही. असा प्रश्न चर्चिला जात आहे. तर दुसरीकडे कनिकाचे स्टारनखरे रुग्णालयातही सुरू असून आपली योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच कनिकाने रुग्णालयातून पळून जाऊन इतरांना संसर्ग करू नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने तिच्या वार्डाबाहेर एका अतिरिक्त गार्डची नेमणूक केली आहे.

First Published on: March 23, 2020 4:23 PM
Exit mobile version