लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरल्या नाहीत; कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर

लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरल्या नाहीत; कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर

बिहारमध्ये काँग्रेसची योग्य साथ न मिळाल्याने महागठबंधन सत्तेपासून दूर राहिल्यामुळे राजदच्या नेत्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रसेमधील ज्येष्ठ नेते देखील राहुल गांधींना घरचा आहेर मिळत आहे. लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. बिहारच नाही तर देशातील पोटनिवडणुका झाल्या, तिथल्या जनतेने देखील काँग्रेसला नाकारले, असे कपिल सिब्बल यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्येही हेच घडले होते. तर उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे की त्यांनी आपल्याला नाकारले आहे असेही कपिल सिब्बल म्हणाले आहेत.

“बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही. या पराभवानंतर पक्ष नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर आलेले नाही. कदाचित सगळे काही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे असे पक्ष नेतृत्वाला वाटत असावे,” अशी टीकाही सिब्बल यांनी केली.

 

First Published on: November 16, 2020 1:28 PM
Exit mobile version