कर्नाटकातील काँग्रेस आमदाराला गुजरातमध्ये अटक

कर्नाटकातील काँग्रेस आमदाराला गुजरातमध्ये अटक

जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा काँग्रेस आमदार जे. एन. गणेश

आपल्याच पक्षातील एका आमदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा काँग्रेस आमदार जे. एन. गणेशचा शोध काही दिवसांपासून पोलीस करत होते. अखेर या शोध मोहिमेला यश मिळाले आहे. जे. एन.गणेशला गुजरात येथून पोलिसांनी अटक केली. भाजप आमदार फोडत असल्यामुळे भयभीत झालेल्या काँग्रेसने कर्नाटकातील आपल्या आमदारांना रिसॉर्टवर ठेवले होते. मात्र या ठिकाणी दोन आमदार आपसातच भिडले होते. यावेळी आमदार जे. एन. गणेशने दुसर्‍या आमदाराच्या डोक्यावर काचेची बाटली फोडली होती. जखमी झालेल्या आमदाराला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरु आहेत. शहरापासून लांब असलेल्या ईदलटन या हॉटेलमध्ये २० जानेवारी रोजी हा प्रकार घडला होता.

१८ अधिकाऱ्यांचे शोध पथक 

पोलीस निरीक्षक बी. दयानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार,”फरार आमदराला गुजरात येथून अटक करण्यात आले आहे. या शोध मोहिमेवर १८ अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात आले होते. मुंबई, गोवा, बल्लारी आणि हैद्राबाद या ठिकाणी यापथकाने आमदाराचा शोध घेतला. जे. एन. गणेशने दुसऱ्या आमदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर गणेश फरार झाला होता. मात्र मिळालेल्या माहितीच्या आधारावर गणेशला अटक करण्यात आली आहे. मागील निवडणुकीतून उदभवलेल्या वादातून या दोन्ही आमदारांमध्ये मारहाण झाली. जखमी आमदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.”

First Published on: February 21, 2019 9:08 AM
Exit mobile version