केजरीवाल यांची आज कोरोना चाचणी होणार

केजरीवाल यांची आज कोरोना चाचणी होणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्याने स्वत:ला त्यांनी आयसोलेट केलं होतं. आज त्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. केजरीवाल यांची कालपासून तब्येत बिघडली असून त्यांना ताप आणि खोकला आहे. ही कोरोनाची लक्षणं असल्याकारणाने त्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.

अरविंद केजरीवाल यांना रविवारी संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. त्यांना ताप आणि खोकला असल्याने त्यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं. रविवारपासूनच्या सर्व बैठका त्यांनी रद्द केल्या आहेत. शिवाय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोणालाही भेटलेले नाहीत. अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीची बातमी समजताच अनेक नेत्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदर्श गुप्ता आणि जुने मित्र कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांना लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

तथापि, कोरोनाने दिल्लीत जोर धरला आहे. राजधानीत आतापर्यंत सुमारे २९ हजार कोरोना संक्रमित आहेत, तर मृतांचा आकडा आठशेच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारने दावा केला आहे की येत्या १५ दिवसांत बेडची संख्या दुप्पट केली जाणार आहे.


हेही वाचा – बंगालमध्ये व्हर्च्युअल रॅलीद्वारे अमित शाह करणार प्रचाराची सुरूवात


दरम्यान, लेफ्टनंट गव्हरनर अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील रूग्णालयात बाहेरील लोकांवर होणारे उपचार थांबवण्याचा आदेश स्थगित केला आहे. यानंतर दिल्लीतील राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याला दिल्लीकरांसाठी एक वाईट बातमी म्हटलं, तर मनीष सिसोदिया यांनी लेफ्टनंट गव्हरनर यांच्यावर थेट भाजपच्या दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे.

 

First Published on: June 9, 2020 10:24 AM
Exit mobile version