घरदेश-विदेशबंगालमध्ये व्हर्च्युअल रॅलीद्वारे अमित शाह करणार प्रचाराची सुरूवात

बंगालमध्ये व्हर्च्युअल रॅलीद्वारे अमित शाह करणार प्रचाराची सुरूवात

Subscribe

बिहारनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये व्हर्च्युअल रॅलीद्वारे मंगळवारी भाजपच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकिच्या तयारीला भाजप आतापासून लागली आहे.

कोरोनामुळे देशातील निवडणूक प्रचाराचे चित्र बदललं आहे. बिहारनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये व्हर्च्युअल रॅलीद्वारे मंगळवारी भाजपच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. अमित शहा यांची ही व्हर्च्युअल रॅली खूप महत्वाची आहे असं म्हटलं जातंय. कारण पुढच्या वर्षी २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजप आतापासूनच तयारीला लागलं आहे.

अमित शहा वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर सकाळी ११ वाजता भाजप कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. या रॅलीत बंगालमधील भाजपाचे सर्व मोठे नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीमुळे बंगालमधील राजकीय चित्र पूर्णपणे बदलून जाईल, असं पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख दिलिप घोष म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची ही आमची पहिली सभा आहे आणि अधिकाधिक लोकांना यामध्ये सामील करुन जागतिक विक्रम करण्याच्या तयारीत आहोत, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

भाजपची तयारी

बिहारमध्येही शहा यांची व्हर्च्युअल रॅली यशस्वी होण्यासाठी भाजपाने कसलीही कसर सोडलेली नव्हती. मेळाव्याला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी ७२ हजार बूथवर ७२ हजार एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या होत्या. बंगालमध्येही भाजपची अशीच तयारी आहे. दिलीप घोष म्हणाले की, राज्यात ८० हजार बूथ असून आमची बूथ कमिटी ६५ हजार बूथमध्ये आहे. प्रत्येक बूथ समितीमध्ये किमान ५ सदस्य आणि सरासरी १०-१५ सदस्य आहेत. अशा प्रकारे ५ लाखाहून अधिक लोक त्यांच्या कुटूंबासह व्हर्च्युअल रॅलीत सामील होतील. तसंच जवळपास २५ हजार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स आहेत, ज्याद्वारे संदेश पाठवले जात आहेत. जेथे इंटरनेट सुविधा नाही आणि ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांना मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे ज्याद्वारे ते मेळावा ऐकू शकतील. त्याशिवाय प्रत्येक विभागात काही एलईडी स्क्रीनसुद्धा लावण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – अम्फान मदतकार्यानंतर एनडीआरएफचे ५० जवान कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisement -

ममता बॅनर्जींची टीका

तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपच्या प्रचारावर टीका केली आहे. ममता म्हणाल्या, “एकट्या भाजपाला इतका खर्च परवडेल, आमच्या पक्षाला नाही.” ममता बॅनर्जी २१ जुलैला भाजपला प्रत्युत्तर म्हणून व्हर्च्युअल रॅली काढत जनतेला संबोधीत करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या दिवसाला शहीद दिवस असं नाव दिलं जाणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -