केरळच्या भाजप प्रदेशाध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

केरळच्या भाजप प्रदेशाध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

केरळः केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आखील भारतीय लोकतांत्रिक महिला संघाच्या सचिव सी. एस. सुजाता यांनी याची पोलिसांत तक्रार केली होती. त्यानुसार, सरेंद्रन यांच्याविरोधात ३५४(अ) आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्रिशूर येथील सभेत बोलताना सुरेंद्र यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आखील भारतीय लोकतांत्रिकच्या महिला नेत्या महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करुन चर्चेत आल्या. मात्र जनतेचा पैसा खाऊन त्या जड झाल्या आहेत. त्या आता राक्षसीन पुतण्याप्रमाणे दिसत आहेत, असे विधान सुरेंद्रन यांनी केले होते.

या विधानाविरोधात लोकतांत्रिक महिला संघाच्या सचिव सुजाता यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. सुरेंद्रन यांच्या विधानावरुन केरळमध्ये सध्या राजकीय घमासान सुरु आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते वी. डी. सतिशन यांनी सुरेंद्रन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुरेंद्र यांनी लोकतांत्रिक महिला संघाच्या नेत्यांची जाहिर माफी मागावी, अशी मागणी सतिशन यांनी केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजय हे गप्प का आहेत, असा सवालही सतिशन यांनी उपस्थित केला आहे.

या आधी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता आणि त्यांचे पती साईनाथ बुटके हे चिमूर येथे राहतात. साईनाथ यांचे मोठे बंधू गजानन बुटके हे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आहेत. भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह बुटके यांच्या घराच्या बाहेर आले. त्यांनी बुटके यांना शिवीगाळ करून त्यांच्या घरात जबरदस्तीने शिरले आणि साईनाथ यांना मारहाण करत बाहेर घेऊन आले. या मारहाणीला विरोध केला असता, त्यांचा विनयभंग केला आणि मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

First Published on: March 29, 2023 1:53 PM
Exit mobile version