‘Kill Narendra Modi’; NIA कडे पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा E-Mail

‘Kill Narendra Modi’; NIA कडे पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा E-Mail

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे समोर आले आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या हाती एक ई-मेल लागला असून त्यामध्ये किल नरेंद्र मोदी असे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात एनआयएने केंद्रीय गृहमंत्र्यालयाला पत्र पाठवले असल्याचेही समजते.

या ई-मेलमध्ये केवळ तीन शब्दच लिहिले आहेत. ‘किल नरेंद्र मोदी’ (Kill Narendra Modi) असा उल्लेख या ई-मेलमध्ये आहे. याबाबत एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून सतर्क केले असून गृहमंत्रालयाने याबाबत एसपीजीलाही माहिती दिली. एसपीजीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

पंतप्रधान मोदींविरोधात कट रचला जात असल्याचे या ई-मेलमधून दिसून येत आहे. मोदींच्या जीवाला धोका असल्याचे ई-मेलमधील माहितीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या ई-मेलसंदर्भात एनआयएने कोणतीही चौकशी अद्याप केलेली नसून सर्वात आधी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवण्यात आलं आहे.

एनआयएने गृहमंत्रालयाला पाठवले असे पत्र

“एनआयएकडे आलेल्या काही ई-मेलमध्ये काही मान्यवर व्यक्तींना तसेच संस्थांना धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलच्या कॉपी आणि माहिती सोबत जोडत आहोत. यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी,” असे एनआयएने गृहमंत्रालयाला पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

नेमके काय म्हटले आहे E-Mail मध्ये…

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार हा ई-मेल ylalwani12345@gmail.com या ई-मेल आयडीवरुन मुंबईतील एनआयच्या ई-मेलआयडीवर पाठवण्यात आला आहे. हा ई-मेल रात्री १ वाजून गेल्यानंतर पाठवण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये Kill Narendra Modi असा तीन शब्दांचा मजकूर आहे.

या प्रकरणामध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला माहिती दिली आहे. तर हा ई-मेल समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रॉ, गुप्तचर यंत्रणा, संरक्षण गुप्तचर यंत्रणा एनआयएच्या संपर्कात आहे. सध्या या ई-मेलमधील मजकुराचा तपास सुरु आहे.


‘मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये’; कंगनाला मनसेची तंबी

First Published on: September 4, 2020 12:08 PM
Exit mobile version