घरताज्या घडामोडी'मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये'; कंगनाला मनसेची तंबी

‘मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये’; कंगनाला मनसेची तंबी

Subscribe

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून 'माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये', असं म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सतत टीका आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे तिच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. कलाकारांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून कंगनाला चांगलच फैलावर घेतलं असून सोशल मीडियावर संताप देखील व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून ‘माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये’, असं म्हटलं आहे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण, माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही’, असंही ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले अमेय खोपकर?

अमेय खोपकर यांनी ट्विट करत कंगनाला चांगलेच फैलावर घेतले आहे. त्यात ते म्हणाले आहे की, ‘माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशाचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण, माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही’.

काय म्हणाली होती कंगना?

‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि मी पुन्हा मुंबईत परत येऊ नये असं म्हटलं. या आधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता तर मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?’

- Advertisement -

हेही वाचा – ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीर’ कंगनाच्या वक्तव्यावर बॉलिवूडकरांबरोबर मराठी कलाकारही संतापले!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -