आता वजन मोजा नव्या पद्धतीने

आता वजन मोजा नव्या पद्धतीने

प्रातिनिधीक फोटो

आता वजन बदलण्याची पद्धत आता बदलणार असून किलोग्रॅम मोजण्यासाठी आता विद्युतप्रवाहावर आधारित नवी व्याख्या मंजूर करण्यात आली आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी शुक्रवारी फ्रान्समधील व्हर्साय येथे नुकतीच एक परिषद पार पडली वजन आणि मापविषयक अशा या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम जगभरातल्या बाजार आणि दैनंदिन व्यवहारांत होणार आहे. पण एक किलोच्या वजनावर याचा काही परिणाम होणार नाही, अशी माहिती देखील या परिषदेतून समोर आली आहे.

१८८९ साली निश्चित झाले वजन

आतापर्यंत आपण जे एक किलोचे वजन वापरत आलो आहोत ते फ्रान्समध्ये १८८९ साली निश्चित करण्यात आले होते. हे वजन आजतागयत पॅरिसजवळील एक तिजोरीत ठेवण्यात आले आहे. एक किलोचा मूळ प्लॅटिनम आणि इरिडियम या धातूंच्या मिश्रणातून बनवलेला दंडगोल जतन करुन ठेवण्यात आला आहे. त्याला ग्रँड के असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या आणखी सहा प्रतिकृती बनवण्यात आल्या आहेत. सगळ्याच देशांना त्यांची वजने तपासण्यासाठी मूळ एक किलोच्या वजनाशी तपासून पाहण्यासाठी पाठवावी लागतात.

का केला बदल?

इतक्या वर्षापासून तयार केलेल्या ठोकळ्याच्या वजनात कालांतराने अनेक फरक झाले असतील. धूळ ,माती साठून त्याच्यावर परीणाम होऊ शकतो. हल्ली सगळ्याच क्षेत्रात अतिसुक्ष्म वजनाचे महत्व वाढत आहे. म्हणून हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तयार केला नवा तराजू

आता विद्युतप्रवाहाच्या मदतीने एक किलो धातूच्या ठोकळ्याचे अचूक वजन मोजण्यासाठी एक खास तराजू तयार करण्यात आला आहे. त्याला किबल बॅलन्स असे नाव देण्यात आले आहे. शास्त्रज्ञ डॉ ब्रायन किबल यांनी तो तराजू तयार केला आहे. याच्या एका पारड्यात एक किलोचा धातूचा ठोकला ठेवून दुसऱ्या पारड्यात विद्युतचुंबकात तराजू हे एका समान पातळीस येईपर्यंत विद्युत प्रवाह सोडला जातो. आता या पुढे विद्युतप्रवाहावर आधारित व्याख्या केली गेली आहे.

मे पासून होणार बदल

शुक्रवारी झालेल्या परिषदेत हा नवा बदल करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी येत्या मे पासून केली जाणार आहे.

 

First Published on: November 17, 2018 6:32 PM
Exit mobile version