दुबईला जाण्याचा प्लॅन करताय? तर ‘या’ लसींचे डोस घेणे गरजेचे; वाचा नवीन गाईडलाईन

दुबईला जाण्याचा प्लॅन करताय? तर ‘या’ लसींचे डोस घेणे गरजेचे; वाचा नवीन गाईडलाईन

दुबईला जाण्याचा प्लॅन करताय? तर 'या' लसींचे डोस घेणे गरजेचे; वाचा नवीन गाईडलाईन

भारतीय लोकांना संयुक्त अरब अमिराती (UAE)कडून मंजूरी मिळालेल्या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर दुबईत एंट्री मिळणार आहे. त्याच्याकडे वैध निवास व्हिसा (valid residence visa) असणे आवश्यक आहे. अलीकडेच अमिराती एअरलाईन्स (Emirates airline) भारत, दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियाहून उड्डाणांना २३ जूनपासून सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान दुबई सरकारने प्रवासी निर्बंधामध्ये सूट जाहीर केली आहे. एप्रिलमध्ये कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेका दरम्यान भारतातील प्रवाशांना UAEचे दरवाजे बंद केले होते.

नवी नियम वाचा

दरम्यान दुबई एअरपोर्टचे टर्मिनल १ १५ महिन्यांनंतर गुरुवारपासून खुले केले जाईल. कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी टर्मिनल २ आणि ३ बंद केले होते. आता दुबईत प्रवाशी येण्याची संख्या अधिक असल्याची शक्यता आहे. त्यामुळे गाईडलाईन्स जारी केली आहे.

First Published on: June 23, 2021 12:55 PM
Exit mobile version