डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन देशाचे आर्थिक सल्लागार

डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन देशाचे आर्थिक सल्लागार

फोटो सौजन्य - The Financial Express

डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी देशाच्या आर्थिक सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पुढील ३ वर्षे डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन हे देशाच्या आर्थिक सल्लागार पदाची जबाबदारी सांभाळतील. यापूर्वी डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन हे इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये कार्यरत होते. अरविंद सुब्रमण्यन यांनी आर्थिक सल्लागार पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिकामं होतं. त्यानंतर  आता डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी पदभार स्वीकारला आहे. आर्थिक सल्लागारपदासाठी सरकारनं ३० जून रोजी अर्ज मागवले होते. त्यातून डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची निवड करण्यात आली आहे.

First Published on: December 7, 2018 4:36 PM
Exit mobile version