Video: तांत्रिक बिघाडामुळे ठप्प होता रेल्वेमार्ग, कामगारांनी अनवाणी पायांनी काम करत सेवा केली पूर्ववत

Video:  तांत्रिक बिघाडामुळे ठप्प होता रेल्वेमार्ग, कामगारांनी अनवाणी पायांनी काम करत सेवा केली पूर्ववत

Video: तांत्रिक बिघाडामुळे ठप्प होता रेल्वेमार्ग, कामगारांनी अनवाणी पायांनी काम करत सेवा केली पूर्ववत

मध्यप्रदेशमधून (Madhya Pradesh) व्हिडिओ समोर येत आहे. मध्य प्रदेशच्या हरदा रेल्वे स्टेशनमध्ये एका टॉवर वॅगनमधील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे रुळावर थांबलेली वॅगन रेल्वे कामगारांमुळे मुख्य ट्रॅकवरुन दुसऱ्या ट्रॅकवर येता आली. जवळपास ४०हून अधिक कामगारांनी मिळून रेल्वे ढकलून दुसऱ्या ट्रॅकवर आणली. कामगारांच्या मेहनतीमुळे वॅगन दुसऱ्या ट्रॅकवर आणण्यात आली. मुख्य म्हणजे वॅगन ढकलताना कामगारांपैकी एकाही कामगाराच्या पायात साधी चप्पल देखील नव्हती. सर्व कामगार अनवाणी पायांनी वॅगन ढकलन होते आणि त्यांच्या परिश्रमाला यश आले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून या कामगारांचे कौतुक होत आहे.

 

टिमरनी स्टेशन जवळ रेल्वे ट्रॅक आणि इलेक्ट्रिक लाइनचे मेंटनन्स करणारी टॉवर वॅगन शनिवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास अचानक खराब झाली. तांत्रिक बिधाडामुळे वॅगन पुढे जाऊ शकत नव्हती. दुपारी १: ४५ च्या सुमारास मालगाडीतून माल घेऊन जाणाऱ्या जवळपास ४० हून अधिक कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले आणि त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वॅगन ढकलण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कामगारांने हे ऑपरेशन करण्यासाठी केवळ १ तासाचा वेळ लागला. वॅगन एका रुळावरुन दुसऱ्या रुळावर आणताना इतर रेल्वेच्या वेळांमध्ये बिघाड झाला. अनेक रेल्वे यावेळी उशिराने धावत होत्या. मध्य प्रदेश मधील ही घटना समोर आल्यानंतर रेल्वे मंत्री स्वत: ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे जाऊन त्या रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अनुभव आणि त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले होते.

 

 


हेही वाचा – Kabul Airport Attack: काबूल विमानतळाजवळ पुन्हा हल्ला; एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी

First Published on: August 30, 2021 9:00 AM
Exit mobile version