लालू प्रसाद यादव यांना जामीन; साडेतीन वर्षानंतर तुरूंगातून होणार सुटका

लालू प्रसाद यादव यांना जामीन; साडेतीन वर्षानंतर तुरूंगातून होणार सुटका

आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांना दुमका कोषागार प्रकरणात आज, शनिवारी जामीन मंजूर झाला आहे. शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती, परंतु न्यायालय बंद असल्याने हे प्रकरण एका दिवसासाठी तहकूब करण्यात आले होते, परंतु आज त्यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. लालू प्रसाद यादव यांना दुमका कोषागारातून अवैध मंजुरीच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. तुरूंगाच्या नियमावलीनुसार लालू यादव यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका करण्यात येणार आहे. कोरोना साथीमुळे, जामीन पत्र भरण्यास किंवा प्रक्रिया पूर्ण करण्यास काही वेळ लागण्याची शक्यता आहे. लालू यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहे.

दरम्यान, चारा घोटाळ्याशी संबंधित देवघर कोषागार प्रकरणात २३ डिसेंबर २०१७ ला बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवले होते. या प्रकरणात सीबीआयच्या विशेष सत्र न्यायालयाने लालू यादव यांना साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्यानुसार, शिक्षेचा अर्धकाळ पूर्ण झाल्यानंतर आरोपीला जामीन दिला जावू शकतो. याच आधारावर लालू यादव यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यासह इतर २ प्रकरणात लालू यादव यांना ७ वर्षाची शिक्षा झाली देण्यात आली आहे.

दुमका कोषागार प्रकरणात लालू यादव यांनी शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केला असून आता त्यांचा जामीन मंजूर झाला पाहिजे, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. यापूर्वी सीबीआयने लालू यादव यांच्या जामिनास विरोध दर्शविला होता. न्यायालयाने आधीच हे स्पष्ट केले की एक शिक्षा पूर्ण होताच दुसरी शिक्षा सुरू करण्यात येईल. मिळालेल्या माहिती नुसार, लालू यादव हे चारा घोटाळ्यातील दुमका, देवघर आणि चाईबासा प्रकरणात शिक्षा भोगत आहे. सध्या प्रकृती बिघडली असल्याचे सांगितले जात आहे. लालू यांना डायबिटीज, हायब्लड प्रेशर, हृदयविकार, क्रॉनिक किडनी डिजीज, फॅटी लीव्हर, पेरियेनल इंफेक्शन, हायपर यूरिसिमिया, किडनी स्टोन, फॅटी हेपेटायटिस, प्रोस्टेट अशा समस्या आहेत.

First Published on: April 17, 2021 3:17 PM
Exit mobile version