लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडली

लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडली

संग्रहित छायाचित्र

आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. रिम्स मेडिकल बोर्डाने बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

रिम्सने याबाबत होटवार जेल प्रशासनालादेखील माहिती दिली आहे. तुरुंग अधीक्षकांनी याची पुष्टी केली आहे. गुरुवारी सायंकाळी श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्या चेहर्‍याला देखील सूज आली होती. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रांचीच्या रिम्स रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. लालूप्रसाद यांच्या फुप्फुसांमध्ये पाणी जमा झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. क्रिएटनीन देखील वाढले असल्याची माहिती लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी दिली. लालूप्रसाद यादव यांच्या तब्येतीसाठी रिम्स प्रशासनाने एका मेडिकल बोर्डाचे गठन केले होते. यामध्ये वेगवेगळ्या विभागातील 8 डॉक्टर आहेत. मेडिकल बोर्डाने त्यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: January 23, 2021 11:39 PM
Exit mobile version