Live Update: कोरोना काळात GSt संकलन पहिल्यांदा १ लाख कोटींच्या पार

Live Update: कोरोना काळात GSt संकलन पहिल्यांदा १ लाख कोटींच्या पार

मुंबईतील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना २००९ पासून सानुग्रह अनुदान महापालिकेकडून देण्यात येत आहे. मात्र हे अनुदान महापालिकेच्या शिक्षकांपेक्षा कमी आहे. त्यामुळे अनुदानामधील भेदभाव दूर करून महापालिकेने ४ हजार ५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी मुंबई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाने केली आहे.


कोरोना व्हायरसच्या संकंटामध्ये डबघाईला आलेला भारतीय अर्थव्यवस्थ हळूहळू पटरीवर येताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यातील वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या आकडेवारीवरुन हे दिसून येत आहे. कोरोना काळात मागील फेब्रुवारी महिन्यापासून जीएसटी संकलन पहिल्यांदा एक लाख कोटींच्या पुढे गेलं आहे. अर्थ मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या सहा महिन्यातील जीएसटी संकलन

एप्रिल- 32 हजार 172 कोटी
मे – 62 हजार 151 कोटी
जून – 90 हजार 917 कोटी
जुलै – 87 हजार 422 कोटी
ऑगस्ट- 86 हजार 449 कोटी
सप्टेबर- 95 हजार 480 कोटी
ऑक्टोबर- 1 लाख 5 हजार 155 कोटी


गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गप्पू गुप्ता यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केले असताना आता राष्ट्रवादी कांग्रेसला गळती सुरू झाली असून राष्ट्रवादीचे उच्च पदाधिकारी असलेल्या 48 लोकांनी काँगेस मध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे गोंदिया जिल्हा हा प्रफुल पटेल यांच्या बाल किल्यात गळती सुरू झाली आहे,यात आजी माजी ग्राम पंचायत सदस्य .जिल्हा परिषद सदस्य यांचा देखील समावेश आहे


लष्करामध्ये भरती करण्याचं आमिष दाखवून शारीरिक चाचणी घेतली होती. फेब्रुवारीत चाचणी घेतल्यानंतर आज वानवडीच्या एआयपीटीच्या मैदानावर लेखी परीक्षा घेतली. या प्रकरणात राजस्थानच्या एजंटसह लष्करातील एका लीपीकाला अटक करण्यात आली आहे. परीक्षेला आलेल्या 30 उमेदवारांकडून 3 ते 4 लाख घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बनावट भरती रॅकेटमधील इतर संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये सभा होत असून यावेळी त्यांनी देशात नकारात्मक गोष्टी पसरवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांवर केला आहे.


बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज अनंतात विलीन


मुंबईत मराठा क्रांती मोर्चाला सुरूवात; लालबाग ते ठाणे निघणार मोर्चा


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. दरम्यान कोरोनाची लस केव्हा उपलब्ध होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कोरोना लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे समन्वय साधण्यासाठी राज्यांनी एक समिती तयार करावी, असे आदेश केंद्र शासनाने राज्यांना दिले आहेत. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी २६ ऑक्टोबरला याबाबत राज्यांना एक पत्र लिहले आहे. त्यात असे म्हटले आहे की, लसीच्या वितरणासाठी आणि त्यासंबंधी सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरु नयेत यासाठी राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी तीन स्तरीय व्यवस्था तयार करावी.भारताची लोकसंख्या लक्षात घेता हा कार्यक्रम वर्षभर चालेल असा अंदाज असल्याने तशा प्रकारचे नियोजन राज्यांनी करावे असे सांगितले आहे. (सविस्तर वाचा)


जीएसटी कलेक्शनने एप्रिल महिन्यापासून प्रथमच १ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला असून ऑक्टोबरमध्ये १.०५ लाख कोटी रुपये जमा केले आहेत


मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत दोन कंटेनरमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. दोन कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला असून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे. वसई हद्दीतील सुवी पॅलेस हॉटेल जवळील ब्रिजजवळ आज सकाळी पावणे सहा वाजता अपघात झाला आहे. मुंबईकडून गुजरातच्या दिशेला जाणारा कंटेनर डिव्हायडर तोडून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनरवर समोरासमोर आदळला आहे. मृत्यू झालेल्या चालकांची आणखी ओळख पटली नाही. वालीव पोलीस ठाण्याच्या बाफाने चौकीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करत आहेत.


बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छपरा येथे जाहीर सभा सुरू असून त्यांनी बिहार सरकारवर निशाणा साधला आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४६ हजार ९६४ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ४७० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८१ लाख ८४ हजार ०८३ इतकी झाली आहे. तर एकूण १ लाख २२ हजार १११ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. (सविस्तर वाचा)


तामिळनाडूचे कृषीमंत्री आर दोराइकन्नू यांचं शनिवारी रात्री निधन झालं. ते करोना विषाणू संक्रमित आढळले होते. दोराइकन्नू मृत्यूसमयी ७२ वर्षांचे होते. दोराइकन्नू १३ ऑक्टोबर रोजी करोना पॉझिटिव्ह आढळले होते. कावेरी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११.१५ मिनिटांनी कृषीमंत्री आर. दोराइकन्नू यांनी अखेरचा श्वास घेतला.


अभिनेता रवीना टंडनच्या नावावर बनावट ट्विटर अकाउंट तयार केल्याबद्दल आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणारे ट्वीट पोस्ट केल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल


बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छपरा, समस्तीपुरा, पूर्व चंपारण आणि पश्चिम चंपारण परिसरात सभांचे आयोजन


दरवर्षी सीमाभागांत कर्नाटक राज्याचा स्थापनादिन हा १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस म्हणून पाळला जातो. १९५६ साली कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यापासून सीमाभागातील ८६५ मराठी भाषिकबहुल गावात १ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्यात येतो. यंदाही तो पाळला जाणार असून सीमावासीयांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज, रविवार १ नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री काळी फीत बांधून त्याला पाठिंबा दर्शवणार आहेत.

First Published on: November 1, 2020 7:06 PM
Exit mobile version