घरCORONA UPDATEचिंता कायम! देशात कोरोनाबाधितांचा आकडा ८१ लाख ८४ हजार ०८३ वर

चिंता कायम! देशात कोरोनाबाधितांचा आकडा ८१ लाख ८४ हजार ०८३ वर

Subscribe

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४६ हजार ९६४ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ४७० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८१ लाख ८४ हजार ०८३ इतकी झाली आहे. तर एकूण १ लाख २२ हजार १११ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तसेच सध्या देशात एकूण ५ लाख ७० हजार ४५८ इतके अॅक्टिव्ह केसेस असून तब्बल ७४ लाख ९१ हजार ५१३ इतक्या जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबरपर्यंत १० कोटी ९८ लाख ८७ हजार ३०३ इतक्या जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १० लाख ९१ हजार २३९ इतक्या जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

तसेच महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ५४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ७८ हजार ४०६ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे.

हेही वाचा –

शिवसेनेत आयारामांना संधी, निष्ठावंतांकडे दुर्लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -