प्राणी संग्रहालयात कोरोनाचा विळखा! तपासणी दरम्यानच सिंह – बिबट्याचा मृत्यू, तर ७० कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणं

प्राणी संग्रहालयात कोरोनाचा विळखा! तपासणी दरम्यानच सिंह – बिबट्याचा मृत्यू, तर ७० कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणं

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाची रूग्णासंख्या तीन कोटींवर गेली आहे. परंतु धक्कादायक घटना म्हणजे कोरोना तपासणीसाठी नुमुने घेत असतानाच एका सिंहाचा आणि बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूच्या अरिगनार अण्णा या प्राणिसंग्रहालयात घडली आहे.

दोन प्राण्यांचा मृत्यू

प्राणिसंग्रहालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयसोबत दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय बिबट्याचं नाव जया होतं. बिबट्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर सिंहाचं वय ५ वर्ष होतं. परंतु अन्ननलिकेत असलेल्या समस्येमुळे सिंहाचा मृत्यू असं त्यांनी म्हटलं आहे. जेव्हा पशुवैद्यकीय कोरोना नमुने घेत होते. तेव्हा या दोन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

७० कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं

गेल्या वर्षीही कविता नावाच्या सिंहिणीचा मृ्तू झाला कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर प्राणीसंग्रहालयातील जवळपास ७० कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय. कर्मचाऱ्यांना क्वाइंटाईन करण्यात आल्यामुळे प्राणीही कोरोना बाधित होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटची चिंता वाढली

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २ लाख ८२ हजार ९७० इतके नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४१ जणांचा मृत्यू झाला आहे. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटची चिंता वाढली असून प्राण्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याची घटना समोर आली. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करणं गरजेचं आहे की नाही, यावर जागतिक आरोग्य संघटनेकडून संकेत देण्यात आले आहेत. परंतु भारतात पूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज नाहीये, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.


हेही वाचा : Goa Assembly Election 2022: गोव्यात आपचा CM पदाचा चेहरा अमित पालेकर, केजरीवालांची घोषणा, कोण आहेत अमित पालेकर?


 

First Published on: January 19, 2022 3:24 PM
Exit mobile version