केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले का वाढतायंत Petrol Diesel चे दर!

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले का वाढतायंत Petrol Diesel चे दर!

देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असताना या इंधन दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. देशभरात इंधनाच्या दराने शंभरी गाठली तर काही ठिकाणी शंभरवर पोहोचण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे उत्पादन घटण्याचे कारण सांगितले आहे. यावेळी धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, इंधनाचे वाढते दर दोन प्रमुख कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. उत्पादक देश आपला नफा वाढवण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करीत आहेत. त्यामुळे कच्चे तेल विकत घेणाऱ्या देशांसाठी ते महाग होत आहे. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आम्ही पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांना म्हणजेच ओपेक आणि ओपेक प्लस देशांना आग्रह आहे की असे होऊ नये, तसेच आम्हाला आशा आहे की, ही परिस्थिती लवकरच सुधारेल.

तर “इंधन दरवाढीचे दुसरे कारण म्हणजे कोरोना व्हायरस आहे. अनेक प्रकारची विकासकामे आपल्याला करावे लागणार असून यासाठी केंद्र व राज्य सरकार कर वसूल करीत आहेत. या विकासकामांवर खर्च केल्यास अधिक रोजगार निर्माण होतील. यासह सरकारने आपली गुंतवणूक वाढविली असून या अर्थसंकल्पात ३४ टक्के अधिक भांडवल खर्च होणार आहे. ते पुढे म्हणाले, ‘राज्य सरकारचा खर्चही वाढणार असून आपल्याला हा कर भरणं आवश्यक आहे. तर खर्च आणि कराच्या माध्यमातून येणारी रक्कम संतुलित राहणं आवश्यक आहेय मात्र देशाच्या अर्थमंत्री लवकरच यासंदर्भात मार्ग मोकळा करतील.

दरम्यान, कच्च्या तेलाची किंमत सलग १२ दिवस वाढविल्यानंतर दोन दिवस स्थिर झाल्या आहेत. तेल कंपन्यांनी रविवारी व सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केलेली नाही. आजही राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर रविवारसारखेच असून एक लिटर पेट्रोलसाठी ९०. ५८ रुपये आणि डिझेलसाठी ८०.९७ रुपये नागरिकांना मोजावे लागणार आहे. तर आज मुंबईत प्रतिलिटर पेट्रोल ९७ रुपये मोजावे लागणार आहे तर एक लिटर डिझेलची किंमत ८८.०६ रुपये आहे. यासह कोलकातामध्ये आज पेट्रोलची किंमत ९१.७८ रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर ८४. ५६ रुपये आहे. तर चेन्नईमध्ये आज एक लिटर पेट्रोलसाठी ९२.५९ रुपये आणि डिझेलसाठी ८५.९८ रुपये सर्वसामान्य नागरिकांना भरावे लागणार आहे.


‘क्या यहीं अच्छे दिन है?’, सेनेची केंद्र सरकारविरोधात जोरदार पोस्टरबाजी
First Published on: February 22, 2021 2:56 PM
Exit mobile version