कमी वाढ होणाऱ्या मुलांमध्ये दलित समाजातील मुले सर्वाधिक – संशोधन

कमी वाढ होणाऱ्या मुलांमध्ये दलित समाजातील मुले सर्वाधिक – संशोधन

जागतिक पातळीवर भारतात एक तृतीयांश इतकी मुले ही कमी वाढ झालेली अशा स्वरूपातील असल्याची आकडेवारी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षण (NFHS) च्या डेटातून समोर आली आहे. एकट्या भारतातच जवळपास ४ कोटी मुलांची कमी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. ही कमी वाढ झालेली मुले ही पाच वर्षे वयोगटातील मुले आहेत. अशोका युनिवर्सिटीच्या आकडेवारीनुसार ही कमी वाढ झालेली मुले दलित समाजातील असल्याचे समोर आले आहे. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यातील दलित मुलांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सुविधांची कमतरता आणि आरोग्याची सुविधांची कमतरता यासारख्या गोष्टीच मुलांमध्ये कमी होणाऱ्या वाढीसाठी प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

अशोका युनिवर्सिटीच्या सेंटर ऑफ इकॉनॉमिक डेटा एण्ड एनेलिसिसनुसार दलित मुलांमध्ये मुलांची वाढ न होण्याचे मुख्य कारण म्हणजे जातीवर आधारीत अस्पृश्यता ही मोठ्या प्रमाणात आढळते. प्रामुख्याने बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात हा अस्पृश्यतेचा प्रकार आढळतो. NFHS च्या आकडेवारीनुसार भारतात कमी वाढ होणाऱ्या मुलांची आकडेवारी ही जागतिक पातळीवर ३० देशांच्या तुलनेत १३ टक्के इतकी अधिक आहे. या ३० देशांच्या आकडेवारीसाठी भारताची तुलना ही दक्षिण आफ्रिकेसोबत करण्यात आली आहे. भारतात तुलनेत समृद्धी असतानाही कमी वाढ होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये कितवे अपत्य आहे तसेच मुलगी आहे की मुलगा आहे यासारख्या गोष्टीवरही ही वाढ अवलंबून असते. त्यासोबतच उघड्यावर शौचाला जाणे, अस्वच्छ पाणीपुरवठा आणि अनुवांशिक आजार यासारखी कारणेही कमी वाढीसाठी कारणीभूत आहेत.

अशोका युनिवर्सिटीत झालेल्या अभ्यासानुसार अश्विनी देशपांडे आणि राजेश रामचंद्रन या अभ्यासानुसार उच्च जातीच्या हिंदूंच्या मुलांची वाढ व्यवस्थित होते. तुलनेत अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ओबीसी, मुस्लिम मुलांची वाढ कमी होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. मुलांमध्ये कमी वाढ होण्याचे प्रमाण हे अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीच्या मुलांमध्ये ४० टक्के इतके आहे. तर ओबीसी समाजात ३६ टक्के इतके प्रमाण आहे. तर ३५ टक्के प्रमाण हे मुस्लिम समाजात आहे. मुलांची कमी वाढ होण्यासाठी अभ्यासामध्ये प्रामुख्याने दलित महिलांना आरोग्याच्या सुविधांची उपलब्धतता हे एक कारण आहे. तर मुलांच्या जन्मानंतर आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा हेदेखील एक कारण समोर आले आहे.

या कमी वाढीचा परिणाम हा मुलांच्या उंचीवर झालेला दिसून येतो. अनुसुचित जाती आणि जमातीच्या घरातील मुलांमध्ये ५८ टक्के मुलांना शौचालयाची सुविधा नसते. तर दुसरे एक कारण म्हणजे प्रसुतीबाबतचे शिक्षण हादेखील एक मुद्दा समोर आला आहे. वरच्या जातींमध्ये ही साक्षरता ८३ टक्के असते तर एससी, एसटी जातीमध्ये ५१ टक्के असते. शिक्षणाच्या बाबतीतही वरच्या जातीतील महिलांना ९.४७ टक्के शिक्षणाची संधी मिळालेली असते. तुलनेत एससीएसटी महिलांना ५.२६ टक्के इतकीच संधी मिळते.

उंची महत्वाची का ?

मुलांची उंची कमी का ? या प्रश्नाचे उत्तर अभ्यासामध्ये शोधण्यात आले. त्यामध्ये एक मुख्य कारण समोर आले ते म्हणजे मुलांचा पोषण आहार. अनेक मुले उंचीने छोटी असण्यासाठी मुलांना कोणत्या प्रकारचा आहार मिळते हे एक मुख्य कारण होते. परिणामी कमी विकसित अशा स्वरूपाचा बौद्धिक विकास होणे, दीर्घकालीन परिणाम, स्मृतीभंश होणे, शिकण्याची क्षमता, शालेय कामगिरी घसरणे यासारखे परिणाम होतात. त्याचा परिणाम हा पोषणाअभावी होणाऱ्या आजारांवरही होत असतो. त्यामध्ये दीर्घकालीन परिणामांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थुलता असेही परिणाम दीर्घकालीन स्वरूपात दिसून येतात.


 

First Published on: July 29, 2021 7:37 PM
Exit mobile version