VIDEO: किनाऱ्याजवळ पोहोचण्यापूर्वी बोट बुडाल्याने ७४ प्रवाशांचा मृत्यू

VIDEO: किनाऱ्याजवळ पोहोचण्यापूर्वी बोट बुडाल्याने ७४ प्रवाशांचा मृत्यू

युरोपकडे जाणारी फेरी बोट लीबियाच्या किनाऱ्याजवळ जात असताना तुटली. यामुळे कमीतकमी ७४ प्रवाशांच्या बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर १ ऑक्टोबरपासून या भागात बोट बुडण्याची ही किमान आठवी घटना आहे. या घटना घडण्यापूर्वी या बोटीत महिला आणि मुलं यांच्यासह एकूण १२० जण होते. ही बोट लीबियातील बंदरगाह अल-खुम्सजवळ बुडाली, असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मायग्रंट एजन्सीचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय स्थलांतर करणार्‍या संघटनेच्या म्हणण्यानुसार केवळ ४७ जणांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. २०११ मध्ये नाटो समर्थित बंडखोरीनंतर लीबियात स्थिर सरकार नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं स्थलांतर करत असतात. साधारण ९०० स्थलांतरितांनी यावर्षी क्रॉसिंग केले आहे. याव्यतिरिक्त ११ हजार स्थलांतरितांना समुद्रात अडविण्यात आले आणि ते लीबियात परत आले.

लीबियात जेथे स्थलांतरितांना बर्‍याचदा ताब्यात घेतले जाते, शोषण केले जाते किंवा अत्याचार केले जातात, असे आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने सांगितले. तर आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना आणि यूएनची परप्रांतीय संस्था यूएनएचसीआर दोघांचे म्हणणे आहे की स्थलांतरितांच्या परतीसाठी लीबियाला सुरक्षित बंदर नसून प्रवाशांनी प्रवास करणं टाळावा.


बराक ओबामांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकात राहुल गांधींचा उल्लेख; म्हणाले…

First Published on: November 13, 2020 9:31 AM
Exit mobile version