LIC च्या ‘या’ योजनेत फक्त एक वेळेस प्रीमियम करा जमा, तुम्हाला दरमहा मिळणार १२ हजार रूपयांचा फायदा, जाणून घ्या

LIC च्या ‘या’ योजनेत फक्त एक वेळेस प्रीमियम करा जमा, तुम्हाला दरमहा मिळणार १२ हजार रूपयांचा फायदा, जाणून घ्या

एलआयसी आपल्या ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक नवनवीन योजना देऊ करते. कारण लोग देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या सर्वात मोठ्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करतात. LIC Saral Pension Yojana ही एक पेन्शन स्कीम आहे. यामध्ये एकदा प्रीमियम भरल्यास कोणत्याही व्यक्तिला वर्षभरात किमान १२ हजार रूपये पेन्शन मिळू शकते.

या पॉलिसीबाबत जाणून घ्या

ही एक Standard Immediate Annuity Plan आहे. ही एक अशी योजना आहे. ज्यामध्ये एकरक्कमी रक्कम जमा केल्यानंतर गुंतवणूकदारांना अॅन्यूईटी मिळवण्यासाठी दोनपैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागतो. यावरून त्या व्यक्तिला या पॉलिसीचा लाभ कसा मिळवायचा हे ठरते.

हे आहेत दोन पर्याय

Life Annuity with return of 100% of purchase price: या पर्यायांतर्गत, एक व्यक्ती किंवा पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत दरमहा १२ हजार रूपये पेन्शन घेण्यास पात्र असतो. दरम्यान, जर तो मरण पावला, तर प्रीमियम नॉमिनीला परत केला जातो.

Joint life last survivor annuity with return of 100%: या योजने अंतर्गत पती-पत्नीला पेन्शन मिळू शकते. पती-पत्नीपैकी जो कोणी दीर्घकाळ जिवंत असेल, त्याला या योजनेअंतर्गत रक्कम दिली जाईल. रक्कम भरताना कोणतीही कपात केली जाणार नाही. मात्र, पती-पत्नी दोघांच्याही मृत्यूनंतर ही योजना नॉमिनीला मूळ किंमतीवर दिली जाते.

एलआयसी सरल पेन्शन योजना

Annuity Plan घेणाऱ्या व्यक्तिचे वय ४० वर्ष असणं गरजेचं आहे. तसेच त्याची कमाल वयोमर्यादा ८० वर्ष असणं गरजेचं आहे. कोणतीही व्यक्ती ही योजना वार्षिक किमान १२ हजार रूपयांच्या वार्षिक लाभासह खरेदी करू शकतो. यासाठी कोणत्याही प्रकारची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाहीये. एलआयसी सरल पेन्शन योजनेअंतर्गत कोणत्याही गुंतवणूकदाराला वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधारावर पेन्शन मिळू शकते.


हेही वाचा : जेम्स लेन यांच्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य शिवरायांविरोधात, जितेंद्र आव्हाडांचा आरोप


 

First Published on: April 17, 2022 4:17 PM
Exit mobile version