LIC Policy : जमा करा फक्त 1302 रुपये आणि मिळवा 27.60 लाख, वाचा सविस्तर..

LIC Policy : जमा करा फक्त 1302 रुपये आणि मिळवा 27.60 लाख, वाचा सविस्तर..

LIC Policy : जमा करा फक्त 1302 रुपये आणि मिळवा 27.60 लाख, वाचा सविस्तर..

LIC मधील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मानली जाते. जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत तुमचे भविष्य सुरक्षित करण्याबरोबरच अधिक परतावा हवा असेल तर अशा ग्राहकांसाठी LIC एक उत्तम योजना घेऊन आली आहे. एलआयसीच्या या नव्या इश्योरंस पॉलिसी अंतर्गत ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 1302 रुपये जमा करावे लागतील आणि नंतर 27 लाख रुपयांचा फायदा मिळू शकतो.दरम्यान, जर तुमचे वय 100 वर्षे ओलांडले तर हा लाभ 63 लाखांपर्यंत वाढतो. या योजनेद्वारे तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकता. तर नेमकी कोणती योजना आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या एलआयसी पॉलिसीजे नाव LIC जीवन उमंग पॉलिसी असून(LIC’s Jeevan Umang plan ) 90 दिवसापासून ते वयाच्या 55 व्या वर्षापर्यत्न वय असणारे व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. हे जीवन संरक्षण सोबतच मॅच्योरिटीवर एकरकमी रक्कम ग्राहकांना देते. तुमच्या पॉलिसीच्या मॅच्योरझाल्यानंतर प्रत्येक वर्षी तुम्हाला एक निश्चित रक्कम मिळते आणि पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब आणि नामनिर्देशित व्यक्तीला एकरकमी रक्कम दिली जाते. या सोबतच महत्वाची बाब म्हणजे हि पॉलिसी वयाच्या 100 वर्षांपर्यंत कव्हरेज प्रदान करते.

कश्या प्रकारे मिळणार 27 लाख

LIC जीवन उमंग पॉलिसी अंतर्गत प्रत्येक महिन्याला ग्राहकाला 1302 रुपये प्रीमियम जमा करावं लागेल, आणि 30 वर्षानंतर प्रीमियमची एकूण रक्कम म्हणजेच 4.50 लाख रुपये होणार. यानंतर पॉलिसीद्वारे तुम्हाला प्रत्येक वर्षी 40 हजार रुपये रिटर्न मिळणार. जर तुम्ही वयाची शंभरी गाठली तर तुम्हाला प्रतीवर्षी 27.60 लाख रुपये रक्कम मिळणार आणि तुम्ही शंभरी ओलांडल्यानंतर 62.95 लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो.

 

अन्य फायदे-

40 हजारांच्या वार्षिक परताव्याव्यतिरिक्त, पॉलिसीधारकाचा मृत्यू किंवा अपघातात अपंगत्व आल्यास विम्याचा लाभ देखील देण्यात येणार. याशिवाय, आयकर कलम 80 सी अंतर्गत ही पॉलिसी घेण्यावर कर सूट देखील उपलब्ध आहे. ही पॉलिसी घेण्यासाठी एखाद्याला किमान दोन लाख रुपयांचा विमा घ्यावा लागतो.


हे हि वाचा – cyber crime:ऑनलाईन फ्रॉड झाल्यास 24 तासात मिळतील संपूर्ण पैसे, वाचा सविस्तर

First Published on: September 8, 2021 4:11 PM
Exit mobile version