Life Certificate : पेन्शनर्स फक्त एक दिवस राहिला शिल्लक; घरबसल्या जमा करा लाईफ सर्टिफिकेट

Life Certificate : पेन्शनर्स फक्त एक दिवस राहिला शिल्लक; घरबसल्या जमा करा लाईफ सर्टिफिकेट

Life Certificate: पेन्शनर्स फक्त एकचं दिवस, शिल्लक, घरबसल्या जमा करा लाईफ सर्टिफिकेट

पेन्शनर्ससाठी लाईफ सर्टिेफिकेट म्हणजेच जीवन प्रमाण पत्र सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. पेन्शनर्स सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन सुरळीत चालू ठेवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. पेन्शनर्स ट्रेजरी, बँक शाखा, कॉमन सर्विस सेंटर आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून हे कर्मचारी लाईफ सर्टिफिकेट जमा करु शकतात. यात एंप्लॉयी पेन्शन स्कीमच्या पेन्शन धारकांना एका वर्षाच्या आत केव्हाही आपले जीवन प्रमाण पत्र जमा करता येते.

३० नोव्हेंबरपर्यंत जमा करा लाईफ सर्टिफिकेट नाही तर बंद होई पेन्शन

जर ३० नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट जमा झाले नाही तर तुमचे पेन्शनची रक्कम बंद होईल. कारण लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यावरूनचं पेन्शन घेणारा व्यक्ती जिवंत आहे की नाही हे समजते.

ऑनलाईन जमा करु शकता लाईफ सर्टिफिकेट

पेन्शनर्सला लाईफ सर्टिफिकेट तयार करण्यासाठी स्वत: जाण्याची गरज नाही.

लाईफ सर्टिफिकेट https://jeevanpramaan.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने जनरेट करता येते.

आधार बेस्ड ऑथेन्टिकेशनच्या माध्यमातून तुम्ही डिजीटल सर्टिफिकेट जनरेट करु शकता.

डोर स्टेप सर्विसच्या माध्यमातून जमा करा लाईफ सर्टिफिकेट

पेन्शनर्सला एसबीआय, पंजाब नॅशनल बँकेसह १२ सरकारी बँकांमध्ये डोरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून डिजिलट लाईफ सर्टिफिकेट सबमिट करण्याची सोय आहे. मात्र या डोस स्टेप सर्विससाठी काही शुल्क द्यावे लागू शकते.


 

First Published on: November 29, 2021 6:35 PM
Exit mobile version