‘लायन एअरलाईन्सचे एकही विमान उडू देऊ नका’

‘लायन एअरलाईन्सचे एकही विमान उडू देऊ नका’

लायन एअरलाईन्सच्या अपघातग्रस्त विमानातून सापडलेले प्रवाशांचे सामान

जकार्ताहून इंडोनेशियाला निघालेले एअर लाईन्सचे विमान अवघ्या १३ मिनिटात समुद्रात कोसळले. आणि सगळ्या प्रवाशांना जलसमाधी मिळाली. लायन एअरलाईन्सचा हा गलथान कारभार पाहता पुन्हा या एअरलाईन्सला विमान उडवण्याची कोणतीही परवानगी देऊ नये अशी मागणी इंडोनेशियाच्या उच्च अधिकाऱ्यांनी केली आहे. २९ ऑक्टोबर रोजी उड्डाण घेतलेल्या या विमानामध्ये बिघाड होता हे माहित असूनही एअरलाईन्सने विमान उडवण्याचा निर्णय घेतलाच असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

इंडोनेशिया विमान अपघात; बिघडलेल्या एअरस्पीड इंडीकेटरसह झाले उड्डाण

विमानाची दुरुस्ती नाही

विमान अपघातानंतर इंडोनेशियाने दिलेल्या अहवालात विमानातील बिघाडासंदर्भात काहीच नोंदी करण्यात आल्या नाही. पण अधिक तपासानंतर विमानातच बिघाड झाल्याचे समोर आले आहे. आता या संदर्भातील अधिक तपास सुरु झाला असून विमानातील बिघाडच या अपघाताला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान उडण्यासाठी योग्य नाही. यात अनेक त्रुटी होत्या. याआधी देखील एका विमानप्रवासादरम्यान हा अनुभव आला होता. त्यावेळी सुदैवाने काही दुर्घटना घडली नाही. इतके सगळे होऊन देखील लायन एअरलाईन्सने हे विमान उड्डाणासाठी कायम ठेवले. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे इंडोनियाच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंडोनेशिया विमान अपघात- भारतीय पायलटचा मृतदेह हस्तगत

उड्डाणावर बंदी आणावी

एअरलाईन्सचा गलथान कारभार पाहता याला भविष्यकाळात कोणत्याही उड्डाणाची परवानगी देऊ नये अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

घटना काय?

लायन एअरलाईन्सचे बोईंग 737मॅक्स हे जकार्ताहून इंडोनेशियासाठी रवाना झाले. पण अवघ्या १३ मिनिटातच या विमानाचा संपर्क तुटला. या विमानात एकूण १८९ प्रवासी प्रवास करत होते. हे विमान प्रवाशांना घेऊन जावा समुद्रात कोसळले.

First Published on: November 29, 2018 4:12 PM
Exit mobile version