घरदेश-विदेशइंडोनेशिया विमान अपघात- भारतीय पायलटचा मृतदेह हस्तगत

इंडोनेशिया विमान अपघात- भारतीय पायलटचा मृतदेह हस्तगत

Subscribe

इंडोनेशिया विमान अपगातात मृत्यू झालेल्या भारतीय पायलटचे शव हस्तगत करण्यास यश मिळाले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

इंडोनेशियात २९ ओक्टोबर रोजी झालेल्या विमान अपघातात विमानाचे पायलट भव्य सुनेजा याचा मृतदेह हस्तगत करण्यास यश मिळाले आहे. मागील अनेक दिवसांपासून भव्यच्या मृतदेहाचा शोध सुरु होता. अखेर त्याचा मृतदेह हस्तगत करण्यास यश मिळाले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटर वरुन दिली आहे. दरम्यान स्वराज यांनी त्याला श्रंद्धाजली दिली असून अशा धाडसी कुटुंबाचे कौतुक केले आहे. मृतदेह मिळाल्यानंतर त्याची वैद्यकिय चाचणी केल्यानंतर ते शव भव्यचे असल्याचे तपास संस्थांनी सांगितले आहे. इंडोनेशियाच्या जावा येथील जकार्ता विमानतळावरून उडलेल्या विमाना अपघात झाला होता. या विमानात १८८ प्रवासी होते.

काय म्हणाल्या सुषमा स्वराज

इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी पायलट भव्य सुनेजा याच्या मृतदेहाची ओळख केली आहे. त्याचे शव जकार्ताच्या भारतीय दुतावासाला सोपवले जाणार आहे. मी त्यांच्या कुटुंबीयाच्या दुःखात सहभागी आहे. – सुषमा स्वराज

- Advertisement -

कोण आहे भव्ये?

भव्ये हा ३१ वर्षाचा पायलट आहे. वयाच्या २१ व्या वर्षापासून तो विमान चालवत होता. २०११ सालापासून भव्ये लायन्स एअरवेज या कंपनीत पायलट म्हणून काम कर्यरत होता. भव्ये मुळचा दिल्लीवासी आहे. तो दिल्लीच्या मयुर विहार परिसरातील रहिवाशी होता. त्याल गेल्या काही महिन्यांपासून भारताची ओढ लागली होती. मला भारतात पोस्टिंग द्या अशी मागणी त्याने त्याच्या वरिष्ठांकडे केली होती. त्याची मागणी लायन्स जेट एअरवेज पूर्ण करत नसल्यामुळे तो एका भारतीय विमान कंपनीत रुजू होणार होता.

- Advertisement -

घटना काय?

जकार्ता येथून लायन एअरच्या ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या प्रवासी विमानाने सकाळी ६.२० वाजता उड्डाण केले होते. उड्डाणानंतर केवळ १३ मिनिटातच या विमानाचा एयर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क तुटला त्यामुळे विमान क्रॅश झाले होते. या विमानामध्ये १७८ प्रवासी होते. तसेच या विमानामध्ये दोन पायलट आणि ८ क्रू मेंबर्सदेखील असल्यामुळे तब्बल १८८ लोक बेपत्ता झालेत. इंडोनेशियाच्या समुद्रात विमान बुडालेल्या प्रवाश्यांचा शोध सुरू आहे. ते जिवंत आहेत की मृत याबाबत अद्याप माहिती मिळाली नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -