‘या’ राज्यात दारूची दुकाने दररोज उघडणार; ‘ऑड-इव्हन’ सिस्टिम केली बंद

‘या’ राज्यात दारूची दुकाने दररोज उघडणार; ‘ऑड-इव्हन’ सिस्टिम केली बंद

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या दरम्यान राजधानी दिल्लीत दारूची दुकाने सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आता दिल्लीत दररोज दारूची दुकाने उघडली जाणार आहेत. नवीन नियमानुसार, जर दुकानदाराने काही अटी पूर्ण केल्या तर दररोज त्याला दारूचे दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल. यापूर्वी दारूची दुकाने ऑड-इव्हन नियमांच्या आधारे उघडली जात होती.

दिल्लीतील दारूच्या दुकानांसाठी नव्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आता दारूची दुकाने उघडताना ऑड-इव्हन सिस्टम बंद करण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार, दारू दुकान मालकाने निर्धारित अटी पूर्ण केल्यास दररोज दुकाने उघडता येतील. आता दिल्लीत दारूची दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत उघडण्याची परवानगी दिली आहे.

राजधानी दिल्लीत आज कोरोनाचे ९९० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्लीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २० हजार ८३४वर पोहोचला आहे. तसेच कोरोनामुळे एकूण ५२३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत आठ हजार ७४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

आतापर्यंत देशांतील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख ९७ हजार २६४वर पोहोचला आहे. त्यापैकी पाच हजार ५७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९४ हजार ३८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील कोरोनाबाधितांचा यादी देश सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.


हेही वाचा – चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे म्हणजे द्वेष पसरवणे नाही – सोनम वांगचुक


 

First Published on: June 1, 2020 10:20 PM
Exit mobile version