Live Update: दिलासा! महाराष्ट्रात कोरोनाच्या Active रुग्णांमध्ये मध्ये घट

Live Update: दिलासा! महाराष्ट्रात कोरोनाच्या Active रुग्णांमध्ये मध्ये घट
शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना शाळेमध्ये उपस्थित राहता यावे यासाठी त्यांना लोकलने प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता लवकरच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे.
दिलासा! महाराष्ट्रात कोरोनाच्या Active रुग्णांमध्ये मध्ये घट
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झालेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अर्णब गोस्वामींचा जामीन मंजूर झाला आहे.
कोळी बांधव कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. कोळी शिष्टमंडळांचे प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.
देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार २८१ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५१२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ८६ लाख ३६ हजार १२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २७ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८० लाख १३ हजार ७८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४ लाख ९४ हजार ६५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात १२ कोटी ७ लाख ६९ हजार १५१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत ११ लाख ५३ हजार २९४ नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीत बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्ववारे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ कोटी १८ लाख ५ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ७९ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ६३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
बुधवारी दिवसभरात राज्यात ३ हजार ७९१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ लाख २६ हजार ९२६ झाली आहे. राज्यात ९२ हजार ४६१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून ४५ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 
First Published on: November 11, 2020 7:30 PM
Exit mobile version