Live Update: क्वारंटाईन असल्यामुळे पुढील आठवड्यात चौकशी करा, प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती

Live Update: क्वारंटाईन असल्यामुळे पुढील आठवड्यात चौकशी करा, प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती
क्वारंटाईन असल्यामुळे पुढील आठवड्यात चौकशी करा, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीला केली आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. पण ते मुंबईबाहेरून आल्याने आता क्वारंटाईन झाले आहेत.
देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार ३७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४८१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९२ लाख २२ हजार २१७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६९९ जणांचा मृत्यू झाला असून ८६ लाख ४२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जगातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ६ कोटी १ लाख २ हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी आतापर्यंत १४ लाख १४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ४ कोटी १५ लाख ५१ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात ५,४३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७, ८९,८०० झाली आहे. राज्यात ८३,२२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा   
First Published on: November 25, 2020 2:30 PM
Exit mobile version