Live Update: पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

Live Update: पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार
कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यानंतर आधी मुंबई महानगर पालिका आणि नंतर ठाणे जिल्ह्यातल्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर आता पुणे जिल्ह्यासाठी देखील असाच निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ३१ डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय न घेता १३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला असून १३ तारखेला पुढील निर्णय घेतला जाईल, असं पुणे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सविस्तर वाचा
गरज पडल्यास ट्रेन, विमानसेवा बंद करण्याचा पर्याय असे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
औरंगाबाद मनपा क्षेत्रातील शाळा ३ जानेवारी पर्यंत शाळा बंद राहणार आहेत. केवळ विद्यार्थ्यांसाठी ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांना मात्र शाळेत यावे लागणार आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षच्या घरी एनसीबीने छापा टाकला आहे. ड्रग पेडलरच्या माहितीवरुन एनसीबीने छापा टाकला आहे. एनसीबीकडून अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात शोधमोहीम सुरु आहे.
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापुरातीलाणखी एक जवान शहीद झाले आहेत. निगवे खालसा गावातील संग्राम पाटील यांना रोजौरी येथी विरमरण आले आहे. भारतीय सैन्यात हवालदार पदावर संग्राम पाटील कार्यरत होते.
कल्याणमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित पत्री पुलाचा गर्डर बसवण्यास अखेर सुरुवात झाली आहे. गर्डर बसवण्याच्या कामासाठी शनिवार २१ नोव्हेंबर आणि रविवार २२ नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर चार तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. पत्री पूल बसवताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहून गर्डर बसवताना स्वतः जातीने लक्ष घालणार आहेत.
First Published on: November 21, 2020 5:33 PM
Exit mobile version