Live Update: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.८१ टक्क्यांवर

Live Update: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.८१ टक्क्यांवर
सीबीआयचे माजी संचालक मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. कुमार हे डीजीपी आणि सीबीआयचे प्रमुखही राहिले आहेत. शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी ANI ला ही माहिती दिली आहे.(सविस्तर वाचा)
हिमाचल प्रदेशातील मनाली जवळ नव्याने उद्घाटन झालेल्या अटल बोगद्यातून भारतीय लष्कराच्या पहिल्या ताफ्याने प्रवेश केला.
गेल्या २४ तासांत राज्यात १४ हजार ७१५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ८० हजार ४८९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३९ हजार ०७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. तसेच आज १६,७१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ११,९६,४४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०. ८१ % एवढे झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने राज्यात रेस्टॉरंट आणि बार पुन्हा सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता त्यासंदर्भात नवीन शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे. या आदेशांनुसार राज्यात रेस्टॉरंट्स आणि बार कोणत्या वेळेत उघडावेत आणि बंद करावेत, यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. नवीन शासन आदेशांनुसार राज्यात रेस्टॉरंट्स आणि बार सकाळी ८ वाजता उघडण्याची तर रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्री बरोबर १० वाजता हे बंद व्हायला हवेत असं देखील या शासन आदेशात नमूद करण्यात आलं आहे. (सविस्तर वाचा)
मिशिन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात राज्यातंर्गत रेल्वे सेवा सुरु करण्याची परवागी देण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने पाच जिल्यादरम्यान 5 विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या जिल्हांच्या दरम्यान या गाड्या 9 ऑक्टोबरपासून धावणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (सविस्तर वाचा)
खासजी तेजस एक्स्प्रेस १७ ऑक्टोबरपासून पुन्हा धावणार कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशातील सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र आता अनलॉकची सुरुवात होताच भारतीय रेल्वेच्या गाड्या हळूहळू रेल्वे रुळावर येत आहे. आयआरसीटीसीची मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस १७ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा किट देण्यात येणार आहे. यामध्ये मास्क, सनिटायझर, फेस शिल्ड आणि हण्ड ग्लोव्हज असणार आहे. तसेच ८ ऑक्टोबर २०२० पासून या गाडीचे आरक्षणही सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशने दिली आहे.
राज्यात २४ तासांत १३२ नस कर्मचारी आढळले आहेत त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २४ हजार ३८६वर पोहोचला आहे. यापैकी २५७ पोलिसांचा मृत्यू झाला असून २१ हजार ५९३ पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच २ हजार ५३६ पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.
जम्मू- काश्मीरमधील शोपिअन जिल्ह्यातील सुगान भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आणखीन एक अज्ञान दहशतवाद्याला ठार झाला आहे. आतापर्यंत एकूण तीन दहशतवाद्यांची खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे, अशी माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिली आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून तिचा जामीन मंजूर झाला आहे. पण रियाचा भाऊ शौविक यांचा जामीन फेटाळला आहे.
देशात गेल्या २४ तासांत ७२ हजार ४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९८६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६७ लाख ५७ हजार १३२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४ हजार ५५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५७ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ९ लाख ७ हजार ८८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
राजस्थानचे कॉंग्रेसचे आमदार कैलाश चंद्र त्रिवेदी यांचे सोमवारी गुडगावच्या मेदांता रुग्णालयात निधन झाले. त्रिवेदी यांनी ७२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. यानंतर त्यांच्यावर राजस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू झाले. जेव्हा ते कोरोनामुक्त झाले तेव्हा त्यांना रुग्णालातून डिस्चार्ज देण्यात आला. पण मधुमेहाचा रुग्ण असल्याने त्याची तब्येत नंतर खालावू लागली. २ ऑक्टोबर रोजी त्यांचे जयपूरहून गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्रिवेदी राजस्थानच्या सहाधा विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
देशात काल दिवसभरात ११ लाख ९९ हजार ८५७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना चाचण्याची संख्या ९ कोटी २२ लाख ७१ हजरा ६५४वर पोहोचली आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.
लडाखमध्ये काल दिवसभरात ७९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे लडाखमधील active रुग्णांचा आकडा १ हजार १९५ इतका आहे. यापैकी लेह जिल्ह्यातील ९०४ रुग्ण असून २९१ रुग्ण कारगिल जिल्ह्यातील आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरुच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ कोटी ६० लाख पार झाला आहे. यापैकी १० लाख ५४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ कोटी ७१ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र असले तरी येथील रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. पण वाढता मृत्यूदर राज्यातील अद्याप चिंताजनक आहे. मंगळवारी राज्यात १२ हजार २५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ६५ हजार ९११ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३८ हजार ७१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)
First Published on: October 7, 2020 11:57 PM
Exit mobile version