LockDown: ९ दिवसांत ९०० किमी मजूरांची चंदिगड ते उत्तरप्रदेश पायीवारी!

LockDown: ९ दिवसांत ९०० किमी मजूरांची चंदिगड ते उत्तरप्रदेश पायीवारी!

LockDown: ९ दिवसांत ९०० किमी मजूरांची चंदिगड ते उत्तरप्रदेश पायीवारी!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक कामगार वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. मात्र अशा परिस्थितीत उपाशी असलेल्या 5 मजूरांनी 9 दिवसात 900 किलोमीटरची पायीवारी केली आहे. हे मजूर बुधवारी पायी प्रवास करून उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे पोहोचले.

9 दिवस 900 किलोमीटर पायी प्रवास

चंदीगड ते बलरामपूर या मार्गावर निघालेले 5 मजूर बुधवारी रात्री सुमारे 900 किमी अंतर पायी पार करून लखीमपूरला पोहोचले. आपलं घर गाठण्यासाठी हा पायी प्रवास करत असताना हे सर्व मजूरांनी तीन दिवसांपासून कोणतेही अन्न खाल्ले नव्हते.

3 दिवस उपाशी, मजूरांनी गाठलं घऱ

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 900 किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या मजूरांनी सांगितले की, गेल्या 3 दिवसांपासून त्यांना कोणतेही अन्न किंवा पाणी मिळालेले नाही. हे समजताच या भुकेल्या मजूरांना या पायी प्रवासात जेवणाची व्यवस्था केली गेली.


आता लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्याची परवानगी मिळणार, वाचा काय आहेत नियम!

हे सर्व मजूर 25 मार्च पासून आपल्या गावातून दूसऱ्या राज्यात काम करण्यासाठी आले होते, मात्र लॉकडाऊनमुळे ते सर्वजण अडकून पडले होते. शेवटी कोणताही पर्याय नसल्याने त्यांनी 900 किलोमीटरचा पायी प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि आपलं घर गाठलं.

First Published on: April 30, 2020 4:13 PM
Exit mobile version