Lockdown: आज आरबीआय गव्हर्नर घेणार पत्रकार परिषद; मोठी घोषणा करण्याची शक्यता

Lockdown: आज आरबीआय गव्हर्नर घेणार पत्रकार परिषद; मोठी घोषणा करण्याची शक्यता

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. अर्थव्यवस्थेला कोरोना संकटापासून वाचवण्यासाठी आज ते एक मोठी घोषणा करू शकतात. यापूर्वी २७ मार्च रोजी त्यांनी काही घोषणा केल्या होत्या. गव्हर्नर शक्तीकांत दास आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांना संबोधित करतील. रिझर्व्ह बँक संकटाच्या वेळी देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी सक्रिय आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २७ मार्च रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी रेपो दरात ०.७५ टक्क्यांनी घट करण्याची घोषणा केली होती.

कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती खराब झाली आहे. लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व प्रकारच्या नोकर्‍या बंद झाल्या आहेत आणि दररोज ३५ हजार कोटींचा तोटा होत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात देशाच्या जीडीपीचे सुमारे ८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. जगातील मध्यवर्ती बँका त्यांची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी सक्रिय आहेत आणि रिझर्व्ह बँकही यामध्ये मागे नाही आहे.


हेही वाचा – शाहीनबाग बनलं कोरोनाचं हॉटस्पॉट; दिल्लीने कोरोनाचे हॉटस्पॉट वाढवले

२७ मार्च रोजी जनतेला दिलासा दिला

यापूर्वी २७ मार्च रोजी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर ७५ बेस पॉईंटने कमी करून ४.४ टक्के केला होता. यामुळे नागरिकांना त्यांच्या ईएमआयमध्ये दिलासा मिळाला. तसंच कमी दरात कर्ज उपलब्ध होईल. या निर्णयामुळे बँकांची तरलता वाढण्यास मदत होईल. ते अधिक कर्ज देण्यास सक्षम असतील. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआर मध्ये कपात करण्याची घोषणा केली. याशिवाय त्यांनी तीन महिन्यांसाठी ईएमआय स्थगित ठेवण्याच्या स्वरूपातही मदत जाहीर केली.

 

First Published on: April 17, 2020 8:57 AM
Exit mobile version