लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याने १५ उच्च जोखीम असलेल्या देशांमध्ये भारत

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याने १५ उच्च जोखीम असलेल्या देशांमध्ये भारत

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याने १५ उच्च जोखीम असलेल्या देशांमध्ये भारत

देशात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र हे धोकादायक असल्याचं एका संशोधनात म्हटलं आहे. एका संशोधनात असं म्हटलं आहे की भारत हा उच्च-जोखीम असलेल्या १५ देशांपैकी एक आहे, जिथे लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याने कोरोनाचं संक्रमण अधिक होणार आहे. त्यामुळे भयानक परिस्थिती निर्माण होईल अन् पुन्हा लॉकडाऊन लागू करावं लागेल. हे विश्लेषण सिक्युरिटीज रिसर्च फर्म नोमुराने केलं आहे.

या विश्लेषणामध्ये ४५ मुख्य अर्थव्यवस्था समाविष्ट केल्या आहेत. अहवालात म्हटलं आहे की, “आमच्या व्हिज्युअल टूलमुळे संमिश्र निकाल मिळाला आहे. देशातील १७ अर्थव्यवस्था रुळावर आहेत आणि त्या देशांवर विषाणूच्या दुसर्‍या लाटेचं कोणतंही सावट नाही. १३ देशांमध्ये तात्पुरते चेतावणीची चिन्हं दिसू लागली आहेत आणि १५ देशांना जास्त धोका आहे. या १५ देशांमध्ये विषाणूची दुसरी लाट येथे येऊ शकते.”

लॉकडाऊनचे नियम शिथिल केले गेले आहेत आणि व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत. दररोज नवीन प्रकरणांमध्ये थोडीशी वाढ होईल. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लॉकडाऊन उठवल्याने रोज संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होईल. लोकांमध्ये भीती पसरेल आणि लोकांच्या कामांवर परिणाम होईल. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा लागू केलं जाऊ शकतं. या संशोधनात भारत जोखीम प्रकारात मोडतो. या वर्गात इंडोनेशिया, चिली, पाकिस्तान आणि इतर अनेक कमी ते मध्यम उत्पन्न असणारे देश आहेत. या गटात स्वीडन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा सारख्या काही प्रगत अर्थव्यवस्थांचादेखील समावेश आहे. फ्रान्स, इटली आणि दक्षिण कोरिया योग्य मार्गावर आहेत. जर्मनी, यूएसए आणि यूके या देशांवर सावट आहे.


हेही वाचा – होय, चीनने भारताच्या जमीनीवर कब्जा केलाय पण…; भाजपचं राहुल गांधींना उत्तर


 

First Published on: June 10, 2020 2:55 PM
Exit mobile version