घरदेश-विदेशहोय, चीनने भारताच्या जमीनीवर कब्जा केलाय पण...; भाजपचं राहुल गांधींना उत्तर

होय, चीनने भारताच्या जमीनीवर कब्जा केलाय पण…; भाजपचं राहुल गांधींना उत्तर

Subscribe

लडाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांचं राहुल गांधीना प्रत्युत्तर

भारत-चीन सीमा वादावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. चीनने लडाखमधील भारताच्या भूमीवर कब्जा केला आहे का? असा सवाल राहुल गांधींनी केला होता. यावर लडाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी राहुल गांधीना प्रत्युत्तर दिलं आहे. लडाखमध्ये चीनने भारतीय जमीन ताब्यात घेतली आहे, परंतु कॉंग्रेसच्या कार्यकाळात, असा टोला त्यांनी लगावला आहे.

चीनने लडाखमधील भारताच्या भूमीवर कब्जा केला आहे का? असा सवाल राहुल गांधींनी केंद्र सरकारला केला होता. यावर उत्तर देताना डाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “चीनने भारतीय जमीन ताब्यात घेतली आहे, परंतु कॉंग्रेसच्या कार्यकाळात. आशा आहे की, तथ्यांच्या आधारे राहुल गांधी आणि कॉंग्रेस माझ्या उत्तरावर समाधानी असतील. ते पुन्हा अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार नाहीत, अशी आशा आहे.”

- Advertisement -

आपल्या ट्विटमध्ये नामग्याल यांनी दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. एका छायाचित्रामध्ये उत्तर आहे तर दुसर्‍याकडे डेमचॉक व्हॅलीचे चित्र आहे. कॉंग्रेसच्या कार्यकाळात चीनने या भागात कब्जा केला असा दावा त्यांनी केला. ट्विटमध्ये चार मुद्दे त्यांनी मांडले आहेत.

१) १९६२ मध्ये कॉंग्रेसच्या काळात अक्साई चिन (३७,२४४ चौरस किमी).
२) यूपीएच्या (संयुक्त पुरोगामी आघाडी) वेळेस २००८ पर्यंत चुमूर प्रदेशात टीया पनगंक आणि चौबजी व्हॅली (लांबी २५० मी.).
३) यूपीएच्या काळात २००८ मध्ये डेमचोक येथील जोरावार किल्ला पीएलएने पाडला आणि पीएलएने २०१२ मध्ये ‘ऑब्झर्व्हिंग पॉईंट’ तयार केला. तसेच १३ सिमेंटची घरं असलेली चिनी वसाहत देखील बांधली.
४) यूपीएच्या काळात २००८-२००९ मध्ये डूंगटी ते देमाजोक यांच्यात भारताने डूम चेला (प्राचीन व्यापार बिंदू) गमावला.

- Advertisement -

हेही वाचा – चिनची घुसखोरी, पंतप्रधान कुठे आहेत?; राहुल गांधींचा सवाल


प्रत्येकाला सीमेचं वास्तव माहित आहे

राहुल गांधींनी ८ जून रोजी अमित शहा यांच्या विधानावर टीका केली आणि म्हटलं की, “प्रत्येकाला सीमेचे वास्तव माहित आहे पण हृदय आनंदी ठेवण्यासाठी शाह-याद चांगली कल्पना आहे.” त्याला उत्तर देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मिर्झा गालिबचा सिंह थोडा वेगळ्या शैलीत आहे. जर हातात वेदना होत असतील तर उपचार करा. यानंतर, राजनाथ सिंह यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले होते की संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या हातावरील भाष्य करणं थांबवलं तर ते या प्रश्नाचं उत्तर देणार का? लडाखमध्ये चिनी सैन्याने भारतीय भूभाग ताब्यात घेतला आहे का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -