तुमचे लॉकर बँकेच्या बेसमेंटमध्ये आहे? तर हे जाणून घ्या!

तुमचे लॉकर बँकेच्या बेसमेंटमध्ये आहे? तर हे जाणून घ्या!

प्रातिनिधिक फोटो

बँकेच्या बेसमेंटमध्ये जर तुमचे लॉकर असेल तर ही बातमी जाणून घेणे तुमच्यासाठी फार महत्वाचे आहे. कारण, ही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर यामुळे तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. बँकेचे लॉकर हे ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंच्या संरक्षणासाठी फार महत्वाचे मानले जाते. आपल्या मोल्यावान वस्तूंसाठी या लॉकर शिवाय दुसरी कुठलीच जागा नसल्याची धारणा ग्राहकांची असते. त्यामुळेच देशातील बहुसंख्य लोक आपले मौल्यावान दागिने आणि पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेच्या लॉकरचा उपयोग करतात. हे लॉकर त्या त्या बँक शाखेच्या नेमून दिलेल्या खोल्यांमध्ये असतात. काही लॉकर शाखेच्या बेसमेंटमध्येही ठेवलेले असतात. काही बेसमेंट लॉकरसाठी भाड्याने घेतलेले असतात. मात्र आता याच लॉकरवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाता आहे. सुप्रीम कोर्टामध्ये तीन सदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत बँकांना असे आदेश देण्यात आले आहेत की, त्यांच्या ज्या बँक शाखांच्या बेसमेंटमध्ये लॉकर आहे, त्यांना सील करण्यात यावे.

३० जूनला लॉकर खाली करण्याचे आदेश

याअगोदरही मार्च महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात ३० जून ही अंतिम तारीख होती. मात्र, तरीही देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही बँकांनी बेसमेंटमध्ये लॉकर ठेवले आहेत.

लॉकर सील करण्याअगोदर दिल्या जातील नोटिसा

कोर्टाने सगळ्या बँकांना आदेश दिले आहेत की, लॉकरला सील करण्याच्या तीन दिवस आधी ग्राहकांना नोटिसा पाठवाव्यात, जेणेकरुन बँकेच्या ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. जर बँकेने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन नाही केले तर, बँकेचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

First Published on: July 17, 2018 9:21 PM
Exit mobile version