मतमोजणीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; गृहमंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा

मतमोजणीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; गृहमंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा

दिल्ली, मुंबईसह पाच शहरं हाय अलर्टवर

विरोधी पक्षांकडून ईव्हीएबाबत शंका घेऊन भडक वक्तव्य करत असताना मतमोजणीदरम्यान हिंसाचार होण्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना दिला आहे. त्याशिवाय काही नेत्यांकडून जाणूनबुझून ईव्हीएमबद्दल शंका घेण्यात येत असल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना मतमोजणीची ठिकाणे आणि ईव्हीएम स्ट्राँग रूमची सुरक्षा वाढवण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्यास सांगितली आहेत.

स्ट्राँग रूम्स, मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढवा

गुरुवारी मतमोजणीदरम्यान, देशात वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व राज्यातील मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुखांना सतर्क केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कायदा-सुव्यवस्था आणि शांतता राखण्यास सांगितले आहे. याशिवाय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील स्ट्राँग रूम्स आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढवण्यासाठी योग्य ते उपाय योजण्यास सांगितले आहे. विरोधकांकडून आणि काही समाजकंटकांकडून हिंसाचाराला प्रवृत्त करणारी वक्तव्ये आणि मतमोजणीच्या दिवशी अव्यवस्था, गोंधळ माजवण्याची धमकी देण्यात आली आहे.

विरोधकांच्या वक्तव्यानंतर उपाययोजना 

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी मंगळवारी एक भडकावू वक्तव्य केले होते. ईव्हीएमसोबत छेडछाडी आणि कथित स्वॅपिंगबाबत कुशवाह म्हणाले की, जर असे झाले तर रस्त्यावर रक्त वाहिल. हत्यार उचलण्याची गरज पडली तर आम्ही हत्यारही उचलू. त्याशिवाय सोशल मिडियावर काही असमाजिक तत्वांकडून हिंसा भडकवण्याच्या हेतूने पोस्ट केले जात आहेत. काहींनी तर ईव्हीएम असलेल्या गाडीला त्यातील लोकांसह पेटवून देण्याची धमकीही दिली आहे.

First Published on: May 22, 2019 8:11 PM
Exit mobile version